shahid kapoor and pankaj kapoor reunite for next film jersey |  पापा पंकज कपूर बनणार शाहिदचे ‘कोच’ !
 पापा पंकज कपूर बनणार शाहिदचे ‘कोच’ !

ठळक मुद्देशाहिदचा हा सिनेमा  28 ऑगस्ट 2020 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

अभिनेता शाहिद कपूर सध्या ‘जर्सी’ या चित्रपटात बिझी आहे. हा चित्रपट ‘जर्सी’ या तेलगू चित्रपटाचा रिमेक आहे. आता शाहिदच्या या चित्रपटात त्याचे पापा पंकज कपूर यांची एन्ट्री झाली आहे. होय, ‘जर्सी’मध्ये पंकज कपूर कोचची भूमिका साकारताना दिसतील.
यापूर्वी या बापलेकाच्या जोडीने 2015 मध्ये आलेल्या ‘शानदार’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. 2011 मध्ये आलेला आणि शाहिद कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘मौसम’ हा सिनेमा पंकज कपूर यांनी दिग्दर्शित केला होता. मात्र हे दोन्ही सिनेमे बॉक्स आॅफिसवर अयशस्वी ठरले होते.


‘जर्सी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन गौथम तिन्नानूरी यांनी केले असून हिंदी रिमेकचे दिग्दर्शनही तेच करणार आहेत. शाहिदने या चित्रपटासाठी ३५ कोटी रुपये मानधन घेतल्याचे कळतेय.  अर्थात चित्रपटाशी संबंधित सूत्रांनी ही बातमी धुडकावून लावली होती. ‘जर्सी’ या साऊथच्या चित्रपटाचा एकूण बजेट 18 कोटी रुपए होता. यात लीड अ‍ॅक्टरच्या मानधनाचाही समावेश होता. अशात याच चित्रपटाच्या रिमेकसाठी मेकर्स शाहिद कपूरला 35 कोटी रुपए देतील, यात काहीही तथ्य नाही. ‘जर्सी’साठी शाहिदने 35 कोटी रुपए घेतल्याच्या बातम्या खोट्या आहेत, असे सूत्रांनी स्पष्ट केले होते.


‘जर्सी’ या तेलुगू चित्रपटातील मुख्य पात्राचे नाव अर्जुन आहे. ही भूमिका दाक्षिणात्य अभिनेता नानीने वठवली होती. चित्रपटात भारतीय क्रिकेट संघात सहभागी होण्यासाठी अर्जुनचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. आता हाच संघर्ष शाहिद कपूर पडद्यावर जिवंत करणार आहे. शाहिदचा हा सिनेमा  28 ऑगस्ट 2020 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Web Title: shahid kapoor and pankaj kapoor reunite for next film jersey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.