ब्‍लॉकबस्‍टर चित्रपट 'कबीर सिंग'सह बॉक्‍स ऑफिसवर धुमाकूळ माजवणारी शाहिद कपूरकियारा अडवाणी ही जोडी पुन्‍हा एकदा एक अनोखी प्रेमकथा सादर करणार आहेत. १०४.८ इश्‍कची आधुनिक ऑन-एअर आणि डिजिटल प्रॉपर्टी 'इश्‍क डबल शॉट्स'मध्‍ये आपल्‍याला हे कलाकार असामान्‍य व लक्षवेधक प्रेमकथेचे वर्णन करताना पाहायला मिळणार आहेत. 'स्‍वत:चा शेवट निवडा' ही सर्वसमावेशक संकल्‍पना आणि आकर्षक पटकथा असलेला हा शो नवीन वेबिसोडसह निश्चितच प्रेक्षकांना मंत्रमुग्‍ध करणार आहे.


शाहिद व कियारा ही ऑन स्क्रिन जोडी 'वन स्ट्रिंग अटॅच्‍ड' कथा सादर करणार आहे. ही प्रेमीयुगुल रूह आणि अंशची काल्‍पनिक कथा आहे. हे दोघेही एका म्‍युझिक अल्‍बमसाठी एकमेकांसोबत काम करत आहेत. अत्‍यंत अभिमानी संगीतकार अंशचा आवाज परिपूर्णपणे सादर करत शाहिद ही भूमिका मोहक रूहच्‍या प्रेमात कशाप्रकारे पडतो याबाबत सांगतो. कायराने रूहची भूमिका बजावली आहे. खरेतर रूहचा विवाह झालेला असतो आणि हा धक्‍कादायक उलगडा झाल्‍यानंतर कथेला नाट्यमय वळण मिळते. 


कलाकारांनी दोन्‍ही भूमिकांचा भावनिक प्रवास सुरेखरित्‍या सादर केला आहे. ज्‍यामुळे प्रेक्षकांना त्‍यांच्‍या इच्‍छेनुसार कथेचा शेवट निवडण्‍याचा पर्याय मिळतो. 


नेटवर्कवरील सुमीत व्‍यास आणि कुब्रा सैटचे पूर्वीचे एपिसोड्स अत्‍यंत रोमांचकारी राहिले आहेत. पण शाहिद कपूर व कायरा अडवाणीसोबत हे नवीन वेबिसोड प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  

ऑन-स्क्रिन जोडीला पुन्‍हा एकत्र पाहण्‍यासाठी इश्‍कच्‍या यूट्यूब चॅनेलला भेट द्या किंवा मुंबई, दिल्‍ली व कोलकातामध्‍ये सोमवार ते शुक्रवार सकाळी ११ वाजता, सायंकाळी ४ वाजता आणि रात्री ८ वाजता 104.8 इश्‍कवर 'इश्‍क डबल शॉट्स'चा आनंद घ्‍या.


Web Title: SHAHID KAPOOR AND KIARA ADVANI TURN RJ FOR A DAY WITH 104.8 ISHQ
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.