ठळक मुद्देशाहिदला भेटल्यानंतर केवळ आठवड्याभरात आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो होता. त्यामुळे आम्ही भेटताच क्षणी एकमेकांना आवडलो असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. 

करिना कपूर आणि शाहिद कपूर यांची प्रेमकथा काही वर्षांपूर्वी मीडियात चांगलीच गाजली होती. त्यांनी देखील त्यांचे प्रेमप्रकरण कधी लपवून ठेवले नाही. मीडियातील मुलाखतींमध्ये ते एकमेकांविषयी भरभरून बोलायचे. एवढेच नव्हे तर कॉफी विथ करण या कार्यक्रमात देखील त्यांनी एकत्र हजेरी लावली होती. त्यामुळे ते आता लवकरच लग्न करणार असे सगळ्यांना वाटत होते. पण जब वी मेट हा चित्रपट प्रदर्शित व्हायच्या काही दिवस आधी त्यांनी त्यांच्या ब्रेकअपची घोषणा केली. सुरुवातीला तर हा एखादा पब्लिसिटी स्टंट असल्याचे त्यांच्या चाहत्यांना वाटत होते. पण काहीच काळात त्यांच्यात खरेच ब्रेकअप झाले असल्याचे सगळ्यांना कळले.

करिना कपूर आणि शाहिद कपूर यांचे प्रेमप्रकरण कधी आणि कुठे सुरू झाले होते याविषयी करिनानेच कोस्मोपॉलिटनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. तिने म्हटले होते की, शाहिद हा प्रचंड मुडी आहे. तो माझ्यासाठी प्रत्येक रोमँटिक गोष्ट करतो. तो मला लाँग ड्राईव्हवर देखील घेऊन जातो. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण शाहिदला भेटल्यानंतर केवळ आठवड्याभरात आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो होता. त्यामुळे आम्ही भेटताच क्षणी एकमेकांना आवडलो असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. 

तुमच्या रिलेशनशिपच्या यशाचे सिक्रेट काय आहे याबाबत विचारले असता शाहिदने सांगितले होते की, आम्ही दोघे एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहोत. ती खूपच बडबडी आहे आहे आणि मी एकदम शांत. आम्ही दोघे एकमेकांमधील असलेली कमतरता भरून काढतो. एकमेकांचे चांगले गुण आणि वाईट गुण यांच्यात ताळमेळ राखतो. त्याचमुळे आमचे नाते स्ट्राँग आहे. 

शाहिद आणि करिना यांच्या ब्रेकअपला आता अनेक वर्षं झाले असून ते आपआपल्या संसारात खूश आहेत. करिनाचे लग्न प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानसोबत झाले असून त्यांना तैमुर हा मुलगा आहे.

तर शाहिदचे लग्न मीरा राजपूत सोबत झाले आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून शाहिदची पत्नी बॉलिवूडशी संबंधित नसली तरी ती अनेक पुरस्कार सोहळ्यांना, कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावते. 

Web Title: Shahid Kapoor about Kareena Kapoor: We were dating within a week of meeting each other

Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.