कुणी त्याला बादशाह म्हणतं तर कुणी रोमान्सचा किंग… आम्ही बोलतोय चित्रपटसृष्टीचा अभिनेता शाहरुख खानबद्दल… आपल्या अभिनयाने शाहरुखने रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलं आहे. करिअरच्या २७ वर्षांत शाहरुखने  ‘डर’, ‘बाजीगर’, ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे’, ‘दिल तो पागल है’, ‘कुछ कुछ होता है’, ‘देवदास’, ‘चक दे इंडिया’ अशा विविध चित्रपटात एकाहून एक सरस भूमिका साकारल्या आहेत. या भूमिकांमुळेच रसिकांनी त्याला बादशाह आणि किंग अशी उपाधी दिली. नेहमीच चर्चेत असलेला शाहरुख जेव्हा प्रत्यक्षपणे मुंबईतल्या प्रसिद्ध ठिकाणी फिरतो तर त्यावेळी कोणाचेच लक्ष त्याच्याकडे गेेल नाही. वाचून थोडे आश्चर्य वाटले असणार त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहतात मात्र समोर असूनही त्याच्यावर कोणाची नजर गेली नाही. होय. काही दिवसांपूर्वी मुंबईत शाहरुखबबाबत  वेगळे चित्र पाहायला मिळालं.


 अलिबागला जाण्यासाठी शाहरुख गेटवे ऑफ इंडियावर आला होता.  यावेळी गर्दी नसल्यामुळे त्याने  गेट वे ऑफ इंडिया गाठलं. यावेळी त्याने मनसोक्त गेट वे ऑफ इंडियाची सैर केली. यावेळी गेट वे ऑफ इंडियासमोर फोटोही काढले. विशेष म्हणजे गेट वेवर फिरण्याचा मनसोक्त आनंद त्याने लोटला. सध्या कोरोनामुळे अनेक ठिकाणं बंद आहेत. लोकांची गर्दी होत नाहीय. शाहरुख फिरत असताना गर्दी नसली तरी काही प्रमाणात तरी लोक उपस्थित होते. मात्र तिथे कोणीच त्याला ओळखू शकलं नाही. तसेच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये शाहरुचा लूकही वेगळा दिसतोय. काळ्या रंगाची ट्राऊझर, पांढरा टी शर्ट आणि राखाडी रंगाची हुडी त्यानं घातली होती. पण, मास्क आणि गॉगल यामुळे तो शाहरुख खान आहे हे कोणाच्याही लक्षात आलं नसावं.


सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘पठाण’ या अ‍ॅक्शन ड्रामा सिनेमाच्या शूटिंगला मुंबईतील यशराज फिल्म्स स्टुडिओमध्ये शाहरुखने सुरूवात केली आहे. सुरुवातीचे शेड्यूल सुमारे दोन महिन्यांचे असणार आहे. या चित्रपटात शाहरुखसह अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहमदेखील दिसणार आहेत. 'पठाण' चित्रपटामध्ये दीपिका शाहरुखबरोबर जोडी करणार आहे तर जॉन अब्राहम खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.


शाहरूख खानचं मानधन बाजूला केलं जर 'पठाण' सिनेमाचं बजेट जवळपास २०० कोटी रूपये असेल. असे सांगितले जात आहे की, आदित्य चोप्राला हा अ‍ॅक्शन सिनेमा इंटरनॅशनल लेव्हलचा करायचा आहे. असे मानले जात आहे की २०२१ च्या दिवाळीत हा सिनेमा रिलीज केला जाऊ शकतो.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shah Rukh was touring the Gateway of India in Mumbai, but no one recognized him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.