शाहरुख खानचे ऑफिस झाले ICU, गंभीर रुग्णांवर होणार उपचार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 12:02 PM2020-08-10T12:02:28+5:302020-08-10T12:03:06+5:30

शाहरुखने एप्रिलमध्ये आपल्या ऑफिसची चार मजली इमारत बीएमसीला दिली.

Shah rukh Kkhan's office became ICU, critical patients will be treated | शाहरुख खानचे ऑफिस झाले ICU, गंभीर रुग्णांवर होणार उपचार

शाहरुख खानचे ऑफिस झाले ICU, गंभीर रुग्णांवर होणार उपचार

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने जवळपास 3 महिन्यांपूर्वीच आपले ऑफिस BMCला दिले आहे. लक्षणे नसलेल्या रूग्णांसाठी क्वॉरांटाईन सेंटर  करण्यात आले आहे. शाहरुख खानचे ऑफिस आता गंभीर रुग्णांसाठी ICUमध्ये रुपांतरित करण्यात आले आहे. शाहरुखने एप्रिलमध्ये आपल्या ऑफिसची चार मजली इमारत बीएमसीला दिली.


कोरोना साथीचा रोग जसजसा पसरला तसतसे शाहरुख खान अनेक राज्य सरकारांना मदत करण्यासाठी पुढे आला आहे. त्याने खारमधील आपली 4 मजली कार्यालय बीएमसीला क्वॉरांटाईन सेंटर तयार करण्यासाठी दिली आहे. शनिवारी त्याचे 15 बेडच्या आयसीयूमध्ये रूपांतर करण्यात आले. हे काम शाहरुखच्या मीर फाउंडेशन आणि हिंदुजा हॉस्पिटलने संयुक्तपणे केले आहे.


शाहरुखने एप्रिलमध्ये आपल्या कार्यालयाची इमारत दिली पण डॉक्टरांची कमतरता असल्याने बीएमसीने मे पर्यंत ते घेतले नाही.
15 जुलैपासून याला ICUमध्ये बदलण्यात आले आणि आयसोलेट करण्यात आलेल्या रुग्णांना दुसर्‍या सेंटरमध्ये हलविण्यात आले. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार आतापर्यंत या क्वॉरांटाईन सेंटरमध्ये 66 लोकांना ठेवण्यात आले होते ज्यापैकी 54 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 12 लोकांना दुसऱ्या सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे कारण यांचे रुपांतर आता ICU मध्ये करण्यात आले. 

Web Title: Shah rukh Kkhan's office became ICU, critical patients will be treated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.