Shah Rukh Khan's daughter Suhana is troubled by this, he said while sharing a photo with his sister Alia | शाहरूख खानची लेक सुहाना या गोष्टीमुळे आहे त्रस्त, बहिण आलियासोबत फोटो शेअर करत सांगितली ही बाब

शाहरूख खानची लेक सुहाना या गोष्टीमुळे आहे त्रस्त, बहिण आलियासोबत फोटो शेअर करत सांगितली ही बाब

बॉलिवूडचा किंग खान शाहरूखची मुलगी सुहाना खान सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे आणि नेहमी तिचे फोटो शेअर करत असते. सुहानाने नुकतेच इंस्टाग्रामवर थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.


सुहाना खानने इंस्टाग्राम स्टोरीवर तिची कजिन आलिया छिब्बासोबत जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोत सुहानाने हिरव्या रंगाचा गुडघ्यापर्यंतचा ड्रेस परिधान केला आहे. तर आलियाने नियॉन कलरचा ब्रालेटवर निटेड टॉप आणि ब्लॅक पँट्स घातली आहे. हा फोटो शेअर करून सुहानाने लिहिले की, ती आलियाला खूप मिस करते आहे. 
सुहाना खानने शेअर केलेल्या फोटोत तिचे डोके अर्धे डोके कट झाले आहे आणि तिने लिहिले की, माझा डोक कट झाले आहे मी खूप जास्त उंच आहे.


सुहानाने वडील शाहरूख खानचा ५३ वा वाढदिवस कुटुंबासोबत दुबईमध्ये सेलिब्रेट केला आहे. या दरम्यान सुहानाचे जे फोटो समोर आले होते त्यात तिचा ग्लॅमरस अंदाज पहायला मिळाला. या फोटोत सुहाना व्हाइट कलरचा शॉर्ट लेदर स्कर्ट आणि मल्टी कलर क्रॉप टॉपमध्ये दिसते आहे. यात ती खूप ग्लॅमरस दिसते आहे. या फोटोत सुहानाने केस मोकळे ठेवले आहेत आणि डार्क लिप कलर लावला आहे. सुहानाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


सुहाना खान सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. इंस्टाग्रामवर १.३ मिलियन म्हणजेच जवळपास १३ लाख फॉलोव्हर्स आहेत. सुहानाला बॉलिवूडमध्ये काम करायचे आहे आणि त्यामुळे ती न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमधून एक्टिंगचा कोर्स करते आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shah Rukh Khan's daughter Suhana is troubled by this, he said while sharing a photo with his sister Alia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.