शाहरुख खान सांगतोय, या कारणामुळे अक्षय कुमारसोबत करत नाही काम, कारण वाचून बसेल धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 02:39 PM2021-06-23T14:39:55+5:302021-06-23T14:40:50+5:30

शाहरुख आणि अक्षय यांनी एकत्र काम न करण्यामागे एक खास कारण असून शाहरुखनेच एका मुलाखतीत याविषयी सांगितले आहे. 

Shah Rukh Khan revealed why he would never work with Akshay Kumar | शाहरुख खान सांगतोय, या कारणामुळे अक्षय कुमारसोबत करत नाही काम, कारण वाचून बसेल धक्का

शाहरुख खान सांगतोय, या कारणामुळे अक्षय कुमारसोबत करत नाही काम, कारण वाचून बसेल धक्का

Next
ठळक मुद्देशाहरुख सांगतो, माझे आणि अक्षयचे लाइफस्टाईल परस्पर विरोधी आहे. अक्षय सकाळी लवकर उठतो आणि रात्री लवकर झोपतो तर मी सकाळी उशिरा उठतो आणि रात्री उशिरापर्यंत जागा असतो.

शाहरुख खान आणि अक्षय कुमार यांनी अनेक वर्षांपूर्वी दिल तो पागल है या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात शाहरुख नायकाच्या तर अक्षय साहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत होता. पण या चित्रपटानंतर त्या दोघांनी कधीच एकत्र काम केले नाही. त्या दोघांनी एकत्र काम न करण्यामागे एक खास कारण असून शाहरुखनेच एका मुलाखतीत याविषयी सांगितले आहे. 

शाहरुख सांगतो, माझे आणि अक्षयचे लाइफस्टाईल परस्पर विरोधी आहे. अक्षय सकाळी लवकर उठतो आणि रात्री लवकर झोपतो तर मी सकाळी उशिरा उठतो आणि रात्री उशिरापर्यंत जागा असतो. या कारणामुळे अनेक महिने माझी आणि अक्षयची भेट देखील होत नाही. या आमच्या दोघांच्या वेळा पाहाता आम्ही दोघे एकत्र काम करू असे मला तरी वाटत नाही.

दिल तो पागल है या चित्रपटात शाहरुख खान मुख्य भूमिकेत असला तरी प्रेक्षकांना शाहरुख आणि अक्षय दोघांचे देखील काम प्रचंड आवडले होते. आजच्या घडीला दोघेही बॉलिवूडमधील सुपरस्टार असून त्यांना एकत्र पाहाण्याची त्यांची चाहत्यांची इच्छा आहे.  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shah Rukh Khan revealed why he would never work with Akshay Kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app