बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खान मागील वीस महिन्यांपासून रुपेरी पडद्यापासून गायब आहे. शेवटचा तो आनंद एल राय यांच्या झिरो चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला होता. त्यानंतर किंग खानला आगामी चित्रपटांची निवड करण्यात कोणतीच चूक करायची नव्हती.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरूख खानने मागील दोन वर्षांपासून संजय लीला भन्साळी, मधुर भांडारकर, सलमान खान आणि अली अब्बास जफर यांच्यासारख्या मोठ्या दिग्दर्शकांच्या चित्रपटांचे ऑफर नाकारले आहेत. काही महिन्यांपूर्वी असे वृत्त आले होते की शाहरूख राकेश शर्मा यांच्या बायोपिकमध्ये काम करण्यास तयार आहे. चित्रपट फ्लोअरवर जाण्याआधी त्याने चित्रपटात काम करण्यास नकार दिला.


मीडिया रिपोर्टनुसार दिग्दर्शक मधुर भांडारकरने शाहरुखला इंस्पेक्टर गालिबच्या नावाने एका अॅक्शन चित्रपटाची ऑफर दिली होती. चित्रपटाच्या स्क्रीप्टसोबत भूमिका आवडलेली असतानाही शाहरूखने चित्रपटात काम करण्यास नकार दिला. कारण किंग खानला वाटले होते की मधुर भांडारकरने शाहरूख खानला मोठ्या एक्शन स्टारच्या रुपात सादर करणार नाही.


त्यानंतर लगेच संजय लीला भन्साळी यांच्या साहिर लुधियानवी यांच्या बायोपिकसाठी शाहरूख खान सोबत बातचीत केली पण शाहरुखला करियरच्या या वळणावर गीतकार-कवीच्या बायोपिक काम करणे योग्य वाटले नाही. मिळालेल्या वृत्तानुसार, या सर्व गोष्टीनंतर सलमानने शाहरूखला गन्स ऑफ नॉर्थ चित्रपटासाठी विचारले. या चित्रपटात आयुष शर्मा महत्त्वाची भूमिका करणार होता. रिपोर्टमध्ये सांगितले आहे की शाहरूख या चित्रपटात पोलिसाची भूमिका साकारण्यासाठी तयार नव्हता. या कारणामुळे शाहरूखने या चित्रपटाची ऑफरदेखील नाकारली.


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक अली अब्बास जफरने किंग खानला मिस्टर इंडियाच्या रिबूटची ऑफर दिली होती. मात्र असे समजते आहे की शाहरूखला जफरसोबत एक सोलो एक्शन चित्रपटात काम करायचे आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shah Rukh Khan has turned down offers of big movies in the last 20 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.