Shah rukh khan deepika padukone and john abraham will be shooting together in abu dhabi | 'पठाण'चे अ‍ॅक्शन सीक्वेन्स अबू धाबीमध्ये शूट करणार शाहरुख खान, किंग खानला मिळणार दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहमचीसाथ

'पठाण'चे अ‍ॅक्शन सीक्वेन्स अबू धाबीमध्ये शूट करणार शाहरुख खान, किंग खानला मिळणार दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहमचीसाथ

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आपला आगामी सिनेमा 'पठाण'ला घेऊन चर्चेत आहे. अलीकडेच त्याने मुंबईतील यशराज फिल्म्स स्टुडिओमध्ये सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली. आता सिनेमाची टीम शूटिंगच्या दुसऱ्या शेड्यूलसाठी अबू धाबीला रवाना होणार आहे.

रिपोर्टनुसार, सिनेमाचे पुढील शेड्यूल पुढील वर्षी जानेवारीत अबुधाबीमध्ये शूट केले जाणार आहे. शाहरुख खान, जॉन अब्राहम आणि दीपिका पादुकोण एकत्र शूटिंग करणार आहेत. अबू धाबीमध्ये 'पठाण' चे अ‍ॅक्शन सीक्वेन्स शूट केले जाणार असल्याची माहिती आहे. यानंतर सिनेमाची टीम यूकेला जाईल जिथे चित्रपटाच्या काही सीन्स शूट केले जातील. जुलैपर्यंत मुंबई सिनेमाचे शूट पूर्ण करण्याचे निर्मात्यांचा प्लान आहे.

'पठाण'मध्ये शाहरुख खान दोन लूकमध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे. सध्या तो लांब केस असलेल्या लुकमध्ये शूटिंग करतो आहे तर पुढच्या शूटसाठी तो केस लहान करणार आहे.ही एका गुप्तहेराची कथा असेल. सिनेमाच्या केंद्रस्थानी भलेही शाहरूख खान आणि त्याची भूमिका असेल, पण दीपिका या मिशनमध्ये शाहरूखची साथ देणार आहे. सलमान आणि कतरिना करणार कॅमिओ करणार आहेत. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shah rukh khan deepika padukone and john abraham will be shooting together in abu dhabi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.