Shah rukh khan and shahid kapoor break a bottle on ayushmann khurrana head video | आयुषमानच्या डोक्यावर शाहरुख खानने फोडली काचेची बाटली, व्हिडीओ झाला व्हायरल
आयुषमानच्या डोक्यावर शाहरुख खानने फोडली काचेची बाटली, व्हिडीओ झाला व्हायरल

सध्या आयुषमान खुराणाचा बाला सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलीच घौडदौड करतोय. याच दरम्यान आयुषमानचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत शाहरुख खान आणि शाहिद कपूर आयुषमानचे रॅगिंग करताना दिसतायेत.   


आजतकच्या रिपोर्टनुसार हा व्हिडीओ तेव्हाच आहे ज्यावेळी आयुषमानचा विक्की डोनर सिनेमा बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला होता. या व्हिडीओत शाहरुख आणि शाहिद आयुषमानची खिल्ली उडवताना दिसतायेत. त्याच्या डोक्यावर बॉटल फोडताना दिसतोय. हा मस्तीचा सीन संपल्यावर शाहरुख आणि शाहिद आयुषमानला स्टेजवरुन खाली पाठवताना इंडस्ट्रीत दोन वर्षे दिसू नकोस असा मस्तीमध्ये सल्ला देताना दिसतायेत. हा पूर्ण सीन शाहिद आणि शाहरुखने फक्त लोकांना हसवण्यासाठी केला होता.  


वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर आयुषमानचा 'शुभ मंगल सावधान' लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी तयार आहे. मात्र या सिनेमाची डेट बदलण्यात आली आहे. याआधी हा सिनेमा 13 मार्च 2020 रिलीज होणार होता. आता हा सिनेमा 21 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. दिग्दर्शक हितेश केवल्या यांनी या सिनेमाची शूटिंग सप्टेंबरपासूनच सुरु केली आहे. रिमेकमध्ये आयुषमानशिवाय नीना गुप्ता, गजराज राव आणि जितेंद्र कुमार यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

Web Title: Shah rukh khan and shahid kapoor break a bottle on ayushmann khurrana head video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.