Sex and the City Is Nothing Without Samantha Jones, said fans | सेक्स अँड द सीटी २ चा ट्रेलर पाहून फॅन्सची झाली निराशा, विचारतायेत समंथा कुठे आहे?

सेक्स अँड द सीटी २ चा ट्रेलर पाहून फॅन्सची झाली निराशा, विचारतायेत समंथा कुठे आहे?

ठळक मुद्देसमंथा या मालिकेची जान होती, तिच्याशिवाय आम्ही या मालिकेच्या दुसऱ्या भागाचा विचार देखील करू शकत नाहीत असे ते कमेंटद्वारे सांगत आहेत.

सेक्स अँड द सीटी ही मालिका २० वर्षांपूर्वी चांगलीच गाजली होती. या मालिकेला जगभरातून लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा फेमस झाल्या होत्या. या मालिकेला आज अनेक वर्षं झाली असली तरी या मालिकेची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाहीये. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत. ९० च्या दशकात सुपरहिट ठरलेल्या सेक्स अँड द सीटी या मालिकेचा आता सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सेक्स अँड द सीटीच्या दुसऱ्या भागाची एचबीओ मॅक्सने घोषणा केल्यानंतर या मालिकेच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. या मालिकेचा सिक्वल मालिका नव्हे तर एक वेबसिरिज असणार आहे. 

सेक्स अँड द सीटी २ चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. हा ट्रेलर प्रेक्षकाना प्रचंड आवडेल अशी या मालिकेच्या निर्मात्यांना खात्री होती आणि तसेच झाले देखील. हा ट्रेलर काहीच तासांत लाखोहून अधिक लोकांनी पाहिला. पण हा ट्रेलर पाहिल्यानंतर या मालिकेचे काही फॅन्स संतापले आहेत. हा ट्रेलर पाहून त्यांची निराशा झाली असे त्यांचे म्हणणे आहे. कारण या ट्रेलरमध्ये समंथा दिसत नाहीये. समंथा कुठे गेली असा सवाल या मालिकेचे चाहते सोशल मीडियाद्वारे विचारत आहेत. समंथा या मालिकेची जान होती, तिच्याशिवाय आम्ही या मालिकेच्या दुसऱ्या भागाचा विचार देखील करू शकत नाहीत असे ते कमेंटद्वारे सांगत आहेत. 

सेक्स अँड द सीटी या मालिकेत सारा पॅरकर, किम कार्टेल, ख्रिस्टन डेविस आणि सिंथिया निक्सॉन या चौघींनी मुख्य भूमिका साकारली होती. जबरदस्त विनोद आणि अफलातून अभिनय यामुळे या मालिकेला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. प्रसिद्ध लेखिका कँडिस बुशनेल यांच्या सेक्स अँड द सीटी या कादंबरीवर आधारित या मालिकेची कथा होती. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sex and the City Is Nothing Without Samantha Jones, said fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.