करीनाच्या धाकट्या मुलाचे फोटो अजूनतरी  समोर आलेले नाहीत. चाहते बेबी बॉयची पहिली झलक बघण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, करीनाचे वडील रणधीर कपूर यांनी एका न्यूज वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की, बेबोचा धाकटा मुलगा  भाऊ तैमूरसारखा दिसतो.
विशेष म्हणजे तैमूर त्याच्या जन्मापासूनच बॉलीवुड आणि मीडियामध्ये लोकप्रिय स्टारकिड आहे. बेगम आणि नवाब तर आपल्या लाडक्या लेकाचे हट्ट पुरवण्यासाठी काहीही करायला तयार असतात. त्यामुळे तैमूरच्या बाललीला नेहमीच प्रत्येकासाठी चर्चेचा विषय ठरतोय.

करीना कपूरचा वंडरबॉय असलेल्या तैमूरमध्ये कपूर घराण्याचे काही ना काही अनुवांशिक अंश असणारच. त्यामुळे कपूर घराण्यापैकी कुणासारखा तरी तैमूर दिसतो असं प्रत्येकाला वाटणं स्वाभाविकच आहे. कुणी म्हणतं की तैमूर त्याचे आजोबा रणधीर कपूर यांच्यासारखा दिसतो तर कुणाला बिल्कुल तसं वाटणार नाही. काहींना तैमूर त्याच्या वडिलांची म्हणजेच छोटे नवाब सैफची छबी असल्यासारखं वाटेल. तैमूरचे असे काही फोटो समोर आलेत की तुम्ही त्याची कपूर घराण्यातील एका बड्या व्यक्तीशी तुलना केल्याशिवाय राहूच शकत नाही.

या फोटोतील तैमूरचा लूक तुम्हाला 'मेरा नाम जोकर' सिनेमातील ऋषी कपूर यांच्याशी मिळताजुळता आहे. 'मेरा नाम जोकर' सिनेमातील ऋषी कपूर आणि तैमूरचे नवे फोटो यांत कमालीचे साम्य आहे. तेच करडे डोळे, हेअरस्टाईल काहीशी तशीच आणि अगदी ऋषी कपूर यांच्यासारखं तसंच स्मितहास्य… सारं काही पाहून तुम्हालाही तैमूर आणि मेरा नाम जोकर सिनेमातील ऋषी कपूर यांच्यात साम्य दिसून येईल.

 

तैमूरचे हे फोटो तुम्हाला ४८ वर्षे मागे घेऊन जातीलल आणि रुपेरी पडद्यावरील मेरा नाम जोकरमधील तो कोवळा ऋषी कपूर आठवल्याशिवाय राहणार नाही. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Seeing these photos of Timur, you will remember Rishi Kapoor from the movie 'Mera Naam Joker'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.