बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे हिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. ती इंडस्ट्रीत बेधडक अंदाजासाठी ओळखली जाते. एका साउथच्या चित्रपटाच्या शूटिंगवेळी तिने एका सुपरस्टारला सणसणीत सपराकदेखील मारली आहे. एका मुलाखतीत राधिका आपटेने याचा खुलासा केला. तिने सांगितले की, त्या अभिनेत्याची वर्तणूक अशी होती की जी पाहून तिचा संताप अनावर झाला आणि ती स्वतःला थांबवू शकली नाही.


एका तमीळ सिनेमात काम करत असताना हा प्रसंग घडला होता. या कार्यक्रमात ती म्हणाली, सेटवर माझा पहिला दिवस होता. पण एका प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याने माझ्या पायाला गुदगुदल्या करण्यास सुरुवात केली. मला धक्का बसला. सिनेमाच्या आधी आम्ही कधीच भेटलो नव्हतो. तरीही तो अभिनेता असा प्रकार कसा काय करु शकतो? मी त्याच वेळी त्याला थोबाडीत मारली, असं राधिका आपटेने सांगितले. राधिकाने हा किस्सा नेहा धुपियाच्या टॉक शोमध्ये सांगितला होता.


२००५ मध्ये राधिकाने वाह, लाईफ हो तो ऐसी या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केले होते. यानंतर शोर इन द सिटी, कबाली, बदलापूर, मांझी- द माऊंटेन मॅन अशा अनेक चित्रपटांत राधिका दिसली आहे. हिंदी चित्रपटांशिवाय राधिकाने मराठी, तेलगू, तामिळ, मल्याळम चित्रपटातही काम केले आहे. राधिकाला खरी ओळख शोर इन द सिटीमधून मिळाली आहे.


राधिका अ कॉल टू स्पाय या इंटरनॅशनल चित्रपटात दिसणार आहे. यात ती नूर इनायत खान नामक हेरची भूमिका यात साकारताना दिसणार आहे. तिच्यासोबत विर्जिना हॉलच्या भूमिकेत सारा मेघन थॉमस दिसणार आहे.

नूर व विर्जिनाची निवड वेरा अॅटकिन्स वर्ल्ड वॉर टूच्या मिशनसाठी निवड करतो. या सिनेमाची स्टोरी वर्ल्ड वॉर टूमधील महिला हिरोंची माहित नसलेली स्टोरी दाखवण्यात येणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Seeing the behavior of this superstar, Radhika Apte's soles of her feet went up in flames.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.