बॉलिवूडमध्ये वेडिंग सीझन पुन्हा सुरु झाले आहे. लवकर बॉलिवूडच्या कपूर कुटुंबाच्या घरात सनईचौघडे वाजणार आहेत. या लग्नाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. होय, राज कपूर यांची कन्या रिमा जैन हिचा मुलगा अरमान जैन लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. गर्लफ्रेन्ड अनीसा मल्होत्रा हिच्यासोबत अरमान लग्नगाठ बांधणार आहे.
 अरमानचा ‘रोका’ झाला. या रोका सेरेमनीला कपूर कुटुंबातील सर्वांनी हजेरी लावली. या सेरेमनीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


यावेळी अरमान व अनीसा स्टाईलिश अवतारात दिसले. अनीसाने बेबी पिंक रंगाचा लहंगा घातला होता तर अरमानने व्हाईट कुर्ता व त्यावर आॅफ व्हाईट कलरचे जॅकेट परिधान केले होते.

करिना कपूर व सैफ अली खान या दोघांनी या सेरेमनीला हजेरी लावली. यावेळी सैफ पांढ-या आऊटफिटमध्ये दिसला तर करिना रेड कलरच्या चुडीदारमध्ये दिसली.

अरमानची चुलत बहीण करिश्मा कपूरही ट्रॅडिशनल अवतारात दिसली.

ऋषी कपूर व नीतू कपूर हेही यावेळी दिसले.

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी यावेळी पिंक कलरच्या साडीत सुंदर दिसत होती.


अरमान व अनीसा दोघेही बालपणापासूनचे मित्र आहेत. 2014 मध्ये हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती. त्यावेळी अरमानने याचा इन्कार केला होता. अनीसा केवळ माझी बालपणीची मैत्रिण आहे, असे त्याने सांगितले होते.

अनीसा अनेकदा अरमानसोबत दिसायची. पण दोघांनीही आपले नाते जगापासून लपवून ठेवले आणि योग्य वेळ येताच दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.

अरमान हा रिमा जैन व मनोज जैन यांचा मुलगा आहे. रिमा ही ऋषी कपूर, रणधीर कपूर आणि राजीव कपूरची बहीण आहे.
अरमानने सुरुवातीला बॉलिवूडमध्ये जम बसवण्याचा प्रयत्न केला. सर्वप्रथम त्याने करण जोहरच्या ‘स्टुडंट आॅफ द ईअर’ आणि ‘एक मैं और एक तू’ या चित्रपटात अस्टिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले. यानंतर हिरो म्हणून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. 2014 साली अरमानने ‘हम दीवाना दिल’ या चित्रपटामधून बॉलिवूड डेब्यू केला होता. पण हा चित्रपट सुपरडुपर फ्लॉप ठरला. यानंतर अरमान कुठल्याच चित्रपटात दिसला नाही. पण करिश्मा, करीना, रणबीर यांच्यासोबत तो अनेक पार्ट्यांना दिसतो.

Web Title: SEE PICS: Family gathers for armaan jain and anissa malhotra roka ceremony kareena kapoor saif ali khan rishi kapoor PICS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.