Security Guard Of Veteran Actress Rekha's Bungalow Tests Positive For Coronavirus | रेखा यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव, बंगला केला सील

रेखा यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव, बंगला केला सील

कोरोना व्हायरसची लागण आतापर्यंत लाखो लोकांना झाली आहे. यामध्ये सिनेसृष्टीतील कलाकारांचा देखील समावेश आहे. गेल्याकाही दिवसांत बोनी कपूर यांच्या घरात काम करणारी व्यक्तीला लागण झाली होती.त्यानंतर आमिर खानच्या स्टाफला करोनाची लागण झालीची माहिती समोर आली होती.यामध्ये त्याचे दोन बॉडीगार्ड आणि स्वयंपाकीचाही समावेश होता.

आता रेखा यांच्या घरातही कोरोनाने शिरकाव केला आहे. वांद्रे येथील बँडस्टँड परिसरात रेखा यांचा ‘सी स्प्रिंग’ हा बंगला आहे.  दोन सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या सुरक्षारक्षकावर उपचार सुरू आहेत. मुंबई महानगरपालिकेने संपूर्ण परिसराला सॅनिटाइज केलं आहे. याप्रकरणी रेखा यांच्याकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

सुरक्षारक्षकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच मुंबई महानगरपालिकेने रेखा यांचा मुंबईतील बंगला सील केला आहे. त्याचसोबत त्यांच्या बंगल्याबाहेर कंटेन्मेंट झोन असल्याचा फलकही लावण्यात आले आहेत.

Read in English

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Security Guard Of Veteran Actress Rekha's Bungalow Tests Positive For Coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.