Saying 'this pride is something different', Sharad Kelkar reminisced about 'Tanhaji' | 'हा अभिमान काही निराळाच' म्हणत शरद केळकरने 'तान्हाजी'मधील आठवणींना दिला उजाळा

'हा अभिमान काही निराळाच' म्हणत शरद केळकरने 'तान्हाजी'मधील आठवणींना दिला उजाळा

अभिनेता शरद केळकर हा चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावंत आणि हरहुन्नरी कलाकार आहे. आपला सहज सुंदर अभिनय आणि एकसे बढकर एक सिनेमांमुळे आपली छाप रसिकांवर पाडली आहे. लक्ष्मी सिनेमात शरदच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे. अक्षय कुमार हिरो असलेला लक्ष्मी सिनेमात शरद केळकरनेच रसिकांची सर्वाधिक पसंती मिळवली आहे. या चित्रपटापूर्वी शरद केळकरने 'तान्हाजी:द अनसंग वॉरियर' या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. ही भूमिकादेखील शरदने उत्तम साकारली होती. नुकतेच शरदने या चित्रपटातील त्याचा एक फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे.

शरद केळकरने फोटो शेअर करत म्हटले की, 'महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या अवतारात पहिल्यांदा येण्याचा अभिमान काही निराळाच होता'. शरदच्या या फोटोवर चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. तान्हाजी: द अनसंग वॉरियर या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. या चित्रपटामध्ये तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची कथा रेखाटण्यात आली होती. 

दिवसेंदिवस शरदच्या फॅन्सच्या संख्येत वाढ होत आहे. नुकतेच त्याने सोशल मीडिया अकाउंटवर  ५ लाखापेक्षा अधिक फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे. यामुळे शरद खूप खूश असून त्याने आपला आनंद सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केला होता. फॅन्सकडून प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक क्षणाला मिळणारे प्रेम हे विशेष तसंच तितकेच खास असते असे म्हणत त्याने आपल्या सर्व फॅन्सचे आभार मानले आहेत

शरद केळकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर त्याने आतापर्यंत लय भारी, मोहेंजोदारो, लक्ष्मी, सरदार गब्बर सिंह, भूमि, राक्षस, रामलीला या चित्रपटात काम केले आहे. तसेच बऱ्याच वेब सीरिज आणि मालिकांमध्येही शरदने काम केले आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Saying 'this pride is something different', Sharad Kelkar reminisced about 'Tanhaji'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.