काम मिळत नसल्याने या अभिनेत्यावर आली होती शिकवणी घेण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 03:07 PM2021-03-05T15:07:54+5:302021-03-05T15:14:21+5:30

सत्या या चित्रपटाने सौरभला कल्लू मामा ही ओळख मिळवून दिली. या चित्रपटानंतर तो रातोरात स्टार बनला. पण या चित्रपटानंतर त्याला तब्बल सहा वर्षं कोणतेच काम नव्हतं.

saurabh shukla birthday special : I didn't get any work after satya for 6 years | काम मिळत नसल्याने या अभिनेत्यावर आली होती शिकवणी घेण्याची वेळ

काम मिळत नसल्याने या अभिनेत्यावर आली होती शिकवणी घेण्याची वेळ

googlenewsNext
ठळक मुद्देसौरभने सांगितले की, सत्या सुपरहिट झाल्यानंतर सगळ्यांनी मला अक्षरशः डोक्यावर घेतले होते. मला या चित्रपटासाठी अनेक पुरस्कार मिळाले. माझ्या लेखनाचे, अभिनयाचे लोक फॅन झाले होते. पण कालांतराने लोक मला विसरले.

सौरभ शुक्लाने एक अभिनेताच नव्हे तर एक लेखक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आज त्याचा वाढदिवस असून 5 मार्च 1973 ला उत्तर प्रदेशमधील गोरखपूरमध्ये झाला. त्याचे वडील शत्रुघ्न शुक्ला हे आग्रा घराण्यातले प्रसिद्ध गायक होते तर त्याची आई जोगामाया या पहिल्या तबला वादक होत्या. त्याच्या आईवडिलांना चित्रपट पाहाण्याची प्रचंड आवड होती. ते दोन वर्षांचे असताना त्यांचे कुटुंब दिल्लीत स्थायिक झाले. त्याने त्याचे शिक्षण दिल्लीत पूर्ण केले.

सौरभ शुक्लाने 1984 मध्ये नाटकाद्वारे त्यांच्या करियरला सुरुवात केली. शेखर कपूरच्या बँडेड क्वीन या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये एंट्री केली. त्यानंतर त्याने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. 1998 मध्ये आलेल्या सत्या या चित्रपटाने सौरभला कल्लू मामा ही ओळख मिळवून दिली. या चित्रपटानंतर तो रातोरात स्टार बनला. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल. पण या चित्रपटानंतर त्याला तब्बल सहा वर्षं कोणतेच काम नव्हतं. छोटीशी भूमिका मिळावी यासाठी देखील सौरभ कित्येक तास निर्मात्यांच्या ऑफिसमध्ये बसून राहात असे.

इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सौरभने सांगितले की, सत्या सुपरहिट झाल्यानंतर सगळ्यांनी मला अक्षरशः डोक्यावर घेतले होते. मला या चित्रपटासाठी अनेक पुरस्कार मिळाले. माझ्या लेखनाचे, अभिनयाचे लोक फॅन झाले होते. पण कालांतराने लोक मला विसरले. माझ्या कामाची लोकांनी प्रशंसा केली असली तरी मला काम द्यायला कोणी तयार नव्हते. त्या दरम्यान मी काही जाहिराती, मालिका लिहिल्या. तसेच ताल, अर्जुन पंडित, बादशहा, हे राम यासांरख्या चित्रपटांमध्ये काम केले. पण चित्रपटांमध्ये काम केल्यानंतरही पैसे वेळेत मिळत नव्हते. यामुळे मी निराशेत गेलो होतो. पुढे काय होणार असा प्रश्न मला पडला होता. या दरम्यान मी कॉलेजमधील मुलांची शिकवणी देखील घेत होतो. सगळे संपले असे वाटत असताना नायक या चित्रपटामुळे माझ्या करियरला पुन्हा वळण मिळाले. 

Web Title: saurabh shukla birthday special : I didn't get any work after satya for 6 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.