Saroj Khan married with 43-year-old dance master at the age of 13 | वयाच्या 13व्या वर्षी 43 वर्षीय डान्स मास्टरसोबत सरोज खान यांनी थाटला होता संसार, नंतर धक्कादायक गोष्टी आल्या होत्या समोर

वयाच्या 13व्या वर्षी 43 वर्षीय डान्स मास्टरसोबत सरोज खान यांनी थाटला होता संसार, नंतर धक्कादायक गोष्टी आल्या होत्या समोर

बॉलिवूडसाठी 2020 हे वर्षे खूप वाईट आहे. एकानंतर एक कलाकारांच्या निधनाच्या वृत्तांमुळे सर्वांना धक्का बसला आहे. नुकतेच झालेल्या अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येने सगळीकडे खळबळ माजली आहे. त्यात आता प्रसिद्ध कोरियोग्राफर सरोज खान यांच्या निधनाच्या वृत्ताने सर्व कलाकारांना धक्का बसला आहे. कार्डियक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाले.

सरोज खान यांचे लग्न केवळ १३ व्या वर्षी झाले होते. ४३ वर्षांचे डान्स मास्टर बी. सोहनलाल यांच्याशी इस्लाम कबूल करून लग्न केले होते. बी सोहनलाल यांचे पहिले लग्न झाले होते. तसेच ते चार मुलांचे वडिलही होते.

सरोज खान यांनी आपल्या लग्नाबद्दल एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा माझे लग्न झाले तेव्हा मी शाळेत जात होती. मला नाही माहिती की लग्नाचं महत्त्व काय होतं. एके दिवशी मास्टर सोहनलाल यांनी गळ्यात एक धागा बांधला, त्यांना वाटलं की त्यांचे लग्न झाले आहे. सरोज खान यांच्या लग्नात खूप अडचणी आल्या. सरोज खान यांना माहिती नव्हते की त्याचे पती यांचे पूर्वीच लग्न झाले आहे. मुलगा राजू खान यांच्या जन्मानंतर त्यांना या गोष्टीचा खुलासा झाला. तेव्हा त्या १४ वर्षांच्या होत्या. १९६५ मध्ये त्यांनी दुसऱ्या बाळाला जन्म दिला. पण त्याचा आठ महिन्यानंतर मृत्यू झाला. 

सरोज खानच्या मुलांना त्यांच्या पतीने नाव देण्यास नकार दिला. यामुळे दोघे वेगळे झाले. सोहनलाल याना हार्ट अटॅक आल्यानंतर ते पुन्हा एकत्र राहू लागले. या दरम्यान, त्यांच्या मुलगी कुकूचा जन्म झाला. सरोज खान यांनी दोघांचे पालन पोषण एकट्यानेच केले.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Saroj Khan married with 43-year-old dance master at the age of 13

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.