Saroj Khan had to lose two movies due to this one mistake | या एका चुकीमुळे सरोज खान यांना गमवावे लागले होते दोन सिनेमे, झाला होता पश्चाताप

या एका चुकीमुळे सरोज खान यांना गमवावे लागले होते दोन सिनेमे, झाला होता पश्चाताप

ठळक मुद्दे‘हम’चे दिग्दर्शक मुकूल एस. आनंद यांनी स्वत: या गोष्टीचा खुलासा केला गेला होता.

सन 1989 साली प्रदर्शित झालेला ‘थानेदार’ आणि यानंतर दोन वर्षांनी आलेला ‘हम’ या सिनेमात एक साम्य आहे. ते म्हणजे, या दोन्ही सिनेमातील अनुक्रमे ‘तम्मा तम्मा लोगे’ आणि ‘जुम्मा चुम्मा दे दे’ ही दोन गाणी.  ही दोन्ही गाणी आणि त्यातील साम्य हा कुठला योगायोग नव्हता तर कोरिओग्राफर सरोज खान यांच्या एका चुकीचा परिणाम होता. होय, सरोज खान यांना पुढे आयुष्यभर या चुकीचा पश्चाताप राहिला.

‘हम’चे दिग्दर्शक मुकूल एस. आनंद यांनी स्वत: या गोष्टीचा खुलासा केला गेला होता. मुकूल आनंद ‘खुदा गवाह’ हा सिनेमा बनवत होते. या चित्रपटातील एका गाण्यासाठी सरोज खान यांना कोरिओग्राफ म्हणून निवडण्यात आले होते. ‘खुदा गवाह’च्या शूटींगवेळी ‘हम’ या चित्रपटातील ‘जुम्मा चुम्मा दे दे’ या गाण्यावर चर्चा सुरु होती. हे गाणेही सरोज खान कोरिओग्राफ करतील असे ठरले होते. गाण्याबद्दलची चर्चा सेटबाहेर जायला नको होती. पण सरोज खान यांनी या गाण्याबद्दलची सगळी माहिती बप्पी लहरी यांना दिली.

 मुकूल यांना ही गोष्ट कळली तेव्हा त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी सरोज खान यांना लगेच ‘हम’मधून काढून टाकले. इतकेच नाही तर ‘खुदा गवाह’मधूनही त्यांना आऊट केले. बप्पी लहरींनी बनवलेले ‘तम्मा तम्मा लोगे’ हे गाणे ‘जुम्मा चुम्मा दे दे’ची नक्कल आहे, असा मुकूल आनंद यांचा आरोप होता आणि यासाठी त्यांनी सरोज खान यांना दोषी ठरवले होते.
आपल्या एका चुकीमुळे अशाप्रकारे सरोज खान यांना दोन चित्रपट गमवावे लागले होते. पुढे या चुकीचा त्यांना पश्चातापही झाला होता.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Saroj Khan had to lose two movies due to this one mistake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.