ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी सारा व कार्तिकने आपल्या नात्यात ब्रेक घेतल्याची बातमी आली होती.

सैफ अली खान व अमृता सिंगची लाडकी लेक सारा अली खानचा दमदार डेब्यू झाला. पाठोपाठ अनेक सिनेमेही मिळालेत. सारा आता सैफ-अमृताची मुलगी म्हणून नाही तर बॉलिवूडची स्टार म्हणून ओळखली जाते. पण गेल्या काही दिवसांपासून सारा तिच्या चित्रपटांपेक्षा पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. होय, कार्तिक आर्यनसोबतच्या तिच्या अफेअरच्या चर्चा सध्या बी-टाऊनमध्ये जोरात आहेत. गेल्या काही महिन्यांत सारा व कार्तिक अनेकदा एकत्र स्पॉट झालेत. परंतु आता या लव्हस्टोरीमध्ये एकट्विस्ट आला आहे. होय, चर्चा खरी मानाल तर साराची आई अमृताला लेकीची लव्हलाईफ खटकू लागली आहे.

बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, सारा व कार्तिक न्यू इअर सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहेत. या सेलिब्रेशनचा प्लानही त्यांनी तयार केला आहे. पण अमृताला साराचा प्लान जराही आवडलेला नाही.

साराने सध्या करिअरवर फोकस करावा आणि कुठल्याही गोष्टीमुळे विचलित होऊ नये, असे अमृताला वाटते. दुसरीकडे सारा प्रेमात आकंठ बुडाली आहे. पर्सनल व प्रोफेशनल लाईफ एकत्र जगता येते, असे तिचे मत आहे. याचमुळे मायलेकींत मतभेद वाढले आहेत.


काही दिवसांपूर्वी सारा व कार्तिकने आपल्या नात्यात ब्रेक घेतल्याची बातमी आली होती. होय, कार्तिक व सारा आपआपल्या प्रोजेक्टमध्ये इतके बिझी आहेत की एकमेकांना वेळ देणे त्यांना अशक्य झाले आहे. ‘लव्ह आज कल 2’चे शूटींग संपल्यानंतर या दोघांनी एकमेकांना वेळ देण्यासाठी नाही नाही तो खटाटोप केला. पण बिझी शेड्यूल या दोघांच्या रोमान्सच्या आड येतेय. कार्तिकने ‘पती पत्नी और वो’चे शूटींग पूर्ण केले. यानंतर लगेच तो ‘दोस्ताना 2’मध्ये बिझी झाला.  साराचे म्हणाल तर ती सुद्धा ‘कुली नंबर 1’च्या रिमेकमध्ये बिझी आहेत. अशात आपले रोमॅन्टिक नाते पुढे नेण्यासाठी सारा व कार्तिकला बरेच कष्ट घ्यावे लागत होते.

Web Title: Sara Ali Khan’s mom, Amrita Singh, up in arms against her relationship with Kartik Aaryan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.