'तू कोणासोबत एक रात्र व्यतित केली आहेस का?', या प्रश्नावरील सारा अली खानच्या उत्तराने सर्वजण झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 06:28 PM2021-05-14T18:28:10+5:302021-05-14T18:29:50+5:30

सारा अली खान वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असते.

Sara Ali Khan's answer to the question, "Who did you spend a night with?" | 'तू कोणासोबत एक रात्र व्यतित केली आहेस का?', या प्रश्नावरील सारा अली खानच्या उत्तराने सर्वजण झाले हैराण

'तू कोणासोबत एक रात्र व्यतित केली आहेस का?', या प्रश्नावरील सारा अली खानच्या उत्तराने सर्वजण झाले हैराण

Next

सारा अली खान वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असते. कधी ग्लॅमरस फोटोमुळे तर कधी केलेल्या विधानामुळे. सारा अली खानने 'केदारनाथ' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने सिंबा, लव्ह आज कल, कुली नंबर १ या चित्रपटात झळकली. तिचे बऱ्याच अभिनेत्यांसोबत नावही जोडले गेले. मात्र एका शोमध्ये तिला विचारल्या गेलेल्या प्रश्नांचे तिने दिलेले उत्तर ऐकून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. 


सारा अली खान करीनाचा शो व्हॉट वुमेन व्हाँटमध्ये गेली होती. त्यावेळी करीनाने साराला बरेच प्रश्न विचारले होते. त्यावेळी बेबोने साराला तू कोणासोबत रात्र व्यतित केली आहेस का, असेदेखील विचारले होते. त्यावर साराने उत्तर दिले होते.


हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, करीनाने सारा अली खानला विचारले की तू कधी कोणाला नॉटी मेसेज पाठवले आहेस का?, या प्रश्नासोबत करीना म्हणाली की तुझे वडीलांनी ऐकू नये म्हणून मी विचारत नाही. प्रश्नांवर थोडा विचार करून साराने लाजत उत्तर हो दिले. त्यानंतर करीना कपूरने सारा अली खानला आणखीन एक खासगी प्रश्न विचारला.

करीना कपूरने साराला म्हटले की मला विचारले नाही पाहिजे पण आपण मॉर्डन लोक आहोत. कधी वन नाइट स्टॅण्ड केले आहेस. वन नाइट स्टॅण्ड म्हणजे कोणासोबत तरी एक रात्र व्यतित करणे. करीना कपूरच्या या प्रश्नावर सारा अली खानने थोडे आडेवेडे घेत उत्तरात सांगितले की मी असे कधीच केले नाही. त्यानंतर करीनाने सुटकेचा निश्वास टाकला.


करीना आणि सारा दोघींमध्ये आई-मुलीच्या नात्यापेक्षा मैत्रीचं नात अधिक आहे. सैफने २०१२ मध्ये करीना कपूरसोबत लग्न केलं.त्यानंतर करिनानेही तैमुरला जन्म देत बॉलिवूडपासून ब्रेक घेत संसारात रमली.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sara Ali Khan's answer to the question, "Who did you spend a night with?"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app