Sara Ali Khan wore Spcial Denim Jeans which Attracted Everyone, know What Is The Price | सारा अली खानने परिधान केलेल्या 'या' जीन्सची किंमत वाचून व्हाल थक्क, वाचा सविस्तर
सारा अली खानने परिधान केलेल्या 'या' जीन्सची किंमत वाचून व्हाल थक्क, वाचा सविस्तर

रिल लाईफ असो किंवा रिअल सेलिब्रेटींच्या स्टाईलवर सारेच फिदा असतात. बॉलिवूडच्या प्रत्येक सेलिब्रिटीची स्टाईल आणि फॅशन हटके आहे. त्यात आवर्जून उल्लेख करावा लागेल तो नवाब सैफ अली खानची लेक सारा अली खानचा. सोशल मीडियावर स्टार किड्सच्या ड्रेसिंग स्टाईल आणि फॅशनची नेहमीच रंगत असते.

सारा अली खानने 'केदारनाथ' सिनेमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.  रुपेरी पडद्यावर झळकण्याआधीच साराने आपल्या स्टाइल आणि फॅशनने साऱ्यांची मने जिंकली आहेत.  सिनेमाचे प्रमोशन किंवा मग बॉलीवुड पार्ट्यांमध्ये साराची स्टाइल चर्चेचा विषय ठरते. अनेकवेळा साराच्या हटके स्टाइलची अनुभूती रसिकांना येत असते. तिच्या सौंदर्यासह आपल्या हटके स्टाईलसाठी सारा सा-यांची फेव्हरेट बनत चालली आहे. 


आपल्या हटके फॅशन आणि स्टाईल स्टेटमेंट्ने  तिने जगभरातील रसिकांची मने जिंकली आहेत. नुकताच सारा अली खानचा एक फोटो समोर आला आहे. हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. कारण या फोटोत तिने डिझायनर डेनिम जीन्स घातल्याचे पाहायला मिळते. या फोटोत साराने घातलेली जीन्स  पाहून त्यावर नेटीझन्स भन्नाट प्रतिक्रीया देत असल्याचे पाहायला मिळत आहे.  साराने घातलेल्या डेनिम जीन्सने सा-यांच्या नजरा आकर्षित केल्या आहेत.  विशेष म्हणजे साराने घातलेल्या या जीन्सची  किंमत जवळपास २ लाख रूपये इतकी आहे. तिने परिधान केलेल्या डेनिम जीन्ससारख्या जीन्स अनेक शॉपिंग वेबसाईटवरही उपलब्ध आहेत. 


Web Title: Sara Ali Khan wore Spcial Denim Jeans which Attracted Everyone, know What Is The Price
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.