बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानकार्तिक आर्यन भलेही वेगळे झाले असले तरीदेखील आताही त्यांच्यातील बॉण्डिंग पहायला मिळतं. सारा व कार्तिक त्यांच्या नात्याबद्दल कधीच उघडपणे सांगितलं नाही. मात्र त्यांचं ब्रेकअप झाल्याचं बोललं जातंय. ब्रेकअपनंतर ते एकत्र दिसले नाहीत. इतकेच नाही तर कार्तिकच्या वाढदिवसादिवशीपण एकत्र त्यांचा फोटो पहायला मिळाला नाही. मात्र आता त्या दोघांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत कार्तिक साराच्या मदतीसाठी धावून आल्याचं पहायला मिळत आहे.

कार्तिक आर्यनसारा अली खानचा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ नुकत्याच पार पडलेल्या स्टार स्क्रीन अवॉर्डमधील आहे. यावेळी कार्तिकनं साराला चॅलेंज देत तिला एका सॅन्डलवर वॉक करायला सांगितलं होतं. सारानं एक सॅन्डल काढून वॉक करायला सुरुवात केली. पण या दरम्यान तिचा पाय ड्रेसमध्ये अडकला आणि ती पाय घसरून पडणार होती. मात्र इतक्यात कार्तिक तिचा हात पकडून तिला आधार देत सावरताना दिसला. 


कार्तिक साराचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडीओमधील या दोघांची केमिस्ट्री 
सर्वांना खूप आवडली आहे. 


काही दिवसांपूर्वी सारा व कार्तिकने आपल्या नात्यात ब्रेक घेतल्याची बातमी आली होती. कार्तिक व सारा आपआपल्या प्रोजेक्टमध्ये इतके बिझी आहेत की एकमेकांना वेळ देणे त्यांना अशक्य झाले आहे. ‘लव्ह आज कल 2’चे शूटींग संपल्यानंतर या दोघांनी एकमेकांना वेळ देण्यासाठी नाही नाही तो खटाटोप केला. पण बिझी शेड्यूल या दोघांच्या रोमान्सच्या आड येतेय.

कार्तिकचा ‘पती पत्नी और वो’ नुकताच रिलीज झाला आहे. आता तो ‘दोस्ताना 2’मध्ये बिझी झाला. साराचे म्हणाल तर ती सुद्धा ‘कुली नंबर 1’च्या रिमेकमध्ये बिझी आहेत.

Web Title: Sara Ali Khan trips and almost falls off stage, Kartik Aaryan saves her. Watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.