sara ali khan takes ropeway car in gulmarg amrita singh got scared watch video | Video : गुलमर्गमध्ये सारा अली खानची धम्माल मस्ती, आई अमृता सिंगला भरली धडकी 

Video : गुलमर्गमध्ये सारा अली खानची धम्माल मस्ती, आई अमृता सिंगला भरली धडकी 

ठळक मुद्देवर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर सारा लवकरच ‘अतरंगी रे’ या सिनेमात दिसणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (sara ali khan) तिच्या मस्तमौला स्वभावासाठी ओळखली जाते. कुटुंबासोबत अधिकाधिक वेळ घालवणारी सारा पुन्हा एकदा व्हॅकेशनवर आहे आणि यावेळी नेहमीप्रमाणे तिची आई आणि भाऊ तिच्यासोबत आहेत. आई अमृता सिंग (amrita singh), भाऊ इब्राहिमसोबत सारा काश्मीर सफरीवर गेली आहे. मग काय, या व्हॅकेशनचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होणारच. सारा व तिच्या आईचा या सफरीवरचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.

या व्हिडीओमध्ये सारा आणि तिची आई, अभिनेत्री अमृता सिंह  गुलमर्गमध्ये  ‘रोप वे’ने प्रवास करताना दिसत आहेत. सारा यावेळभ रोप वेचा आनंद घेतेय, शिवाय आपल्या चाहत्यांसाठी खास व्हिडीओ शूट करतेय, दुसरीकडे साराची आई अमृता हिची घाबरगुंडी उडालीये. भीतीपोटी तिने आपले डोळे गच्च मिटून घेतले आहेत. आईची ही अवस्था पाहून सारा तिची मजा घेताना दिसतेय. या प्रसंगाला आणखी मजेशीर करण्यासाठी तिचीच कॉमेंट्री सुरु आहे.रोप वे मधून उतरल्यानंतर सारा बर्फाच्छादित प्रदेशात सुटीची मजा घेताना दिसतेय. भावासोबतचे काही फोटोही तिने शेअर केले आहेत.

व्हिडीओतील साराची कॉमेंट्री जबरदस्त आहे. तिची ही कॉमेंट्री चाहत्यांना चांगलीच आवडली आहे. साहजिकच हा व्हिडीओ व्हायरल होतोय.
काही दिवसांपूर्वी सारा आई व भावासोबत मालदिवमध्ये सुट्टीचा आनंद घेताना दिसली होती. या मालदिव व्हॅकेशनचे अनेक फोटो व व्हिडीओ तिने शेअर केले होते.  वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर सारा लवकरच ‘अतरंगी रे’ या सिनेमात दिसणार आहे. आनंद एल राय दिग्दर्शित या सिनेमात ती अक्षय कुमार व धनुषसोबत दिसणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: sara ali khan takes ropeway car in gulmarg amrita singh got scared watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.