ठळक मुद्देसाराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर येत्या काळात ‘कुली नंबर 1’च्या रिमेकमध्ये ती दिसणार आहे.

‘केदारनाथ’ या सिनेमातून डेब्यू करणा-या सारा अली खानने अनेकांची मने जिंकलीत. आज सारा बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. पण त्याआधी म्हणजे बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याआधी साराचे वजन 95 किलो होते. हिरोईन होण्याच्या स्वप्नापोटी तिने आपले वजन कमी केले. अभिनेत्री बनण्याचे तिचे स्वप्नही पूर्ण झाले. पण आता वजन कमी करणेही साराला त्रासदायक ठरते आहे. विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे. होय, कमी झालेल्या वजनामुळे साराला अमेरिकेच्या विमानतळावर नेहमीच अडवले जाते.

साराचा ‘लव्ह आज कल’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ती अमेरिकेला गेली होती. यावेळीही विमातळावरच तिला थांबवले गेले. कारण काय, तर तिच्या पासपोर्टवरचा फोटो. होय, साराच्या पासपोर्टवर तिचा जुना फोटो आहे. म्हणजे, अगदी गोलमटोल असतानाचा.  

या फोटोमुळे विमानतळावरील अधिका-यांना तिला ओळखणे कठीण झाले होते. ती दुस-याच कुठल्यातरी मुलीच्या पासपोर्टवर प्रवास करत असल्याचा त्यांचा समज झाला. मात्र अखेर तिची कसून चौकशी झाल्यावर ती साराच आहे हे सिद्ध झाले आणि साराची सुटका झाली.  हा किस्सा साराने एका शोमध्ये सांगितला.

 केवळ फोटोच नाही तर सरनेममुळेही तिला मनस्ताप सहन करावा लागतो. कारण स्टुडंट व्हिसावर तिचे सरनेम ‘सुल्तान’ आहे तर ट्रॅव्हल व्हिसावर ‘सारा अली खान’ असे सरनेम आहे. यामुळे विमानतळावर तिला अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. या सगळ्यांमुळे सारा वैतागली आहे. कमी झालेले वजन आणि व्हिसावरचे नाव यामुळे  अमेरिकेत जाणे-येणे बंद होऊ नये, इतकीच तिची अपेक्षा आहे.
साराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर येत्या काळात ‘कुली नंबर 1’च्या रिमेकमध्ये ती दिसणार आहे. यात ती वरूण धवनसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसेल.
 

Web Title: Sara Ali Khan Shares How Her Physical Transformation Made US Airport Authorities Skeptical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.