ठळक मुद्देसारा अली खानने पोस्ट केलेल्या या फोटोत तिने कपाळावर टिकली लावली आहे तर मोठाले कानातले घातले आहेत. तसेच नाकात छोटीशी नथ देखील घातली आहे. या फोटोतील साराचा लूक हा अगदी भारतीय आहे. तिचा हा लूक पाहून लोकांना बेताब या चित्रपटातील अमृता सिंगची आठवण येत आहे.

सारा अली खानने पहिल्याच सिनेमातून आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. साराने 'केदारनाथ' मधून डेब्यू केल्यानंतर रणवीर सिंगच्या अपोझिट 'सिम्बा' मध्ये तिची वर्णी लागली. सिम्बाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. साराला केदारनाथ या चित्रपटासाठी यंदाचा फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार देखील मिळाला. तिच्या अभिनयाचे, लूकचे सगळेच कौतुक करत आहेत.

साराला खूपच कमी वेळात चांगलेच फॅन फॉलोव्हिंग मिळाले आहे. तिच्या सोशल नेटवर्किंग साईटवर तर तिचे फॅन्स तिला मोठ्या संख्येने फॉलो करतात. सारा देखील तिच्या चाहत्यांसाठी तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिने इन्स्टाग्रामवर नुकताच पोस्ट केलेला एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. सारा अली खानने पोस्ट केलेल्या या फोटोत तिने कपाळावर टिकली लावली आहे तर मोठाले कानातले घातले आहेत. तसेच नाकात छोटीशी नथ देखील घातली आहे. या फोटोतील साराचा लूक हा अगदी भारतीय आहे. तिचा हा लूक पाहून लोकांना बेताब या चित्रपटातील अमृता सिंगची आठवण येत आहे. या फोटोत तू अगदी तुझी आई अमृता सिंगसारखी दिसत आहेस असे तिचे चाहते कमेंटद्वारे सांगत आहेत. 

सारा अली खानने हा फोटो शेअर करताना एक छान पोस्ट देखील लिहिली आहे. तिने म्हटले आहे की, तुम्ही रोज उठून स्वतःला आरशात पाहिले पाहिजे आणि स्वतःवर गर्व केला पाहिजे. पण तुम्ही इमानदार आहात तेव्हाच ही गोष्ट तुम्ही करू शकता असे मला वाटते. तुम्ही भाग्यवान आहात की, तुम्हाला रोज तुमची कथा लिहिण्याची संधी मिळत आहे. 

सारा अली खान सध्या तिच्या लव्ह आज कल या चित्रपटाच्या सिक्वलच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटाचे नाव आज कल असून या चित्रपटात कार्तिक आर्यन तिच्यासोबत मुख्य भूमिकेत आहे. विशेष म्हणजे लव्ह आज कल या चित्रपटात साराचे वडील सैफ अली खाननेच मुख्य भूमिका साकारली होती.


Web Title: Sara Ali Khan shares black-and-white photo of herself and fans scream Amrita Singh doppelganger
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.