ठळक मुद्देसाराच्या या फोटोंची चर्चा आहेच, शिवाय तिच्या लव्ह लाईफची चर्चाही सध्या जोरात आहे.  

सारा अली खानने पुन्हा एकदा मालदीव व्हॅकेशनचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत सारा ऑरेंज कलरच्या बिकिनीत आहे. समुद्राकाठी ती हॉट पोज देताना दिसतेय. तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या फोटोंना साराने दिलेले कॅप्शन चांगलेच मजेदार आहे. ‘व्हिटॅमिन सीचा तुमचा डेली डोज,’ असे तिने लिहिले आहे. 
अलीकडे सारा मालदीव व्हॅकेशनवर गेली होती. यावेळी तिची आई अमृता आणि भाऊ इब्राहिम तिच्यासोबत होते. या व्हॅकेशनचे काही सुंदर फोटो तिने शेअर केले होते.

साराच्या या फोटोंची चर्चा आहेच, शिवाय तिच्या लव्ह लाईफची चर्चाही सध्या जोरात आहे.  नवाब सैफ अली खानची लाडकी लेक सारा अली खान कधीकाळी कार्तिक आर्यनच्या प्रेमात वेडी झाली होती. मध्यंतरी या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा जोरात होत्या. पण आता सारा एका साऊथ सुपरस्टारच्या प्रेमात पडल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.  हा साऊथ सुपरस्टार कोण तर तेलगू सुपरस्टार विजय देवरकोंडा.

होय, काही दिवसांपूर्वीच सारा व विजयच्या एका फोटोने इंटरनेटवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता.  सारा व विजयचा फोटो तुफान व्हायरल झाला होता आणि यानंतर सारा व विजय यांच्यात काहीतरी शिजतेय, अशी चर्चाही सुरु झाली होती.

काही दिवसांपूर्वी  मनीष मल्होत्राच्या घरी पार्टी झाली आणि या पार्टीतील फोटो पाहून सारा व विजयच्या रिलेशनशिपच्या चर्चेला पुन्हा उधाण आले.  सारा व विजय यांच्यातील केमिस्ट्री पाहून हे दोघे एकमेकांना डेट करताहेत का? असा प्रश्न सर्वांना पडला.  सारा व विजय एकाचवेळी पार्टीला पोहोचले आणि एकमेकांना बघताच दोघांनीही अशी मिठी मारली होती. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: sara ali khan shared pictures of herself from maldives beach vacation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.