sara ali khan revealed intersting facts about her mother amrita singh-ram | अमृता सिंगने 10 वी बोर्डाच्या परिक्षेत केला होता हा कारनामा, लेकीनेच केला खुलासा

अमृता सिंगने 10 वी बोर्डाच्या परिक्षेत केला होता हा कारनामा, लेकीनेच केला खुलासा

ठळक मुद्देसैफ व अमृता यांच्या घटस्फोटानंतर अमृताने आपल्या दोन्ही मुलांना एकत्र सांभाळले. 

बॉलिवूडची यंग अ‍ॅक्ट्रेस सारा अली खान तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. तिचे चाहतेही तिच्या याच स्वभावाचे ‘दिवाने’ आहेत. याच चुलबुल्या साराने आई अमृता सिंगबद्दल एक मजेदार खुलासा केला आहे.  बोर्डाच्या परिक्षेत साराच्या आईने म्हणजे अमृताने काय केले होते, याचा खुलासा तिने केला आहे.


होय, साराने केलेल्या खुलाशानुसार,  10 बोर्डाच्या परिक्षेत एकही प्रश्न न सोडवता उत्तरपत्रिकेवर केवळ ‘लव्ह अमृता’ लिहून अमृता घरी परतली होती.
‘ माझी आई कुठल्याही प्रश्नाचे उत्तर न लिहिता उत्तरपत्रिकेवर ‘लव्ह अमृता’ लिहून एक्झाम हॉलमधून बाहेर पडली होती. आता तिला किती मार्क्स पडले असतील ते तुम्ही समजू शकताच,’ असे साराने यावेळी सांगितले.

पापा सैफबद्दलही बोलली सारा
पापा सैफ अली खानसोबत कसे नाते आहे हेही साराने सांगितले. तिने सांगितले, ‘माझे डॅड एक मस्तमौला व्यक्ती आहेत. डॅड अगदी माझ्यासारखे आहेत. मनात असेल ते अगदी तोंडावर बोलणारे. ते आमच्यापासून दूर राहतात. पण मनाने ते आमच्या अतिशय जवळ राहिले. एक कॉल केल्याबरोबर ते धावत येतात. त्यांनी करिना कपूरसोबत लग्न केले, यात आम्हाला काहीही विचित्र वाटले नाही़. आम्ही करिनाला डॅडची पत्नी म्हणून स्वीकारले आहे, ’ असे तिने सांगितले.

तुम्हाला ठाऊक आहेच की, सैफ व अमृता यांच्या घटस्फोटानंतर अमृताने आपल्या दोन्ही मुलांना एकत्र सांभाळले. तर सैफने करिनासोबत वेगळा संसार थाटला. अलीकडे सारा आपल्या आई-वडिलांच्या घटस्फोटाबद्दलही बोलली होती. बरे झाले माझ्या आई-वडिलांनी घटस्फोट घेतला. दोन लोक एकमेकांसोबत आनंदी राहू शकत नसतील तर त्यांनी विभक्त व्हावे. त्यात काहीही गैर नाही. केवळ मुलांसाठी तडजोड करण्यात काहीही अर्थ नाही, असे सारा म्हणाली होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: sara ali khan revealed intersting facts about her mother amrita singh-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.