ठळक मुद्देवीर चित्रपटगृहात गेल्यावर त्याची सीट शोधत असताना त्याचे साराकडे लक्ष गेले. पण त्या दोघांनीही एकमेकांकडे न बघणेच पसंत केले. एवढेच नव्हे तर चित्रपट संपल्यानंतर सारा लगेचच चित्रपटगृहातून निघून गेली. 

सारा अली खानने केदारनाथ या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटातील तिच्या परफॉर्मन्सची चांगलीच चर्चा झाली होती. त्यानंतर ती सिम्बा या चित्रपटात झळकली. साराचा अभिनय पाहाता तिला लम्बी रेस का घोडा मानले जाते. साराने आतापर्यंत केवळ दोन चित्रपटात काम केले असले तरी तिला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग आहे. 

सारा काही दिवसांपूर्वी करण जोहरच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमात झळकली होती. त्यावेळी कार्तिक आर्यनला डेट करायला आवडेल असे तिने सांगितले होते. पण तुम्हाला माहीत आहे का, बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वीच सारा नात्यात होती. पण त्या दोघांनी एकमेकांच्या संमतीने ब्रेकअप केले. 

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी साराचे अफेअर होते हे तिने देखील एका मुलाखतीत कबूल केले होते. तिने सांगितले होते की, वीर हा एकच व्यक्ती आहे, ज्याच्यासोबत मी नात्यात होते. वीर हा प्रसिद्ध राजकारणी सुशील कुमार शिंदे यांचा नातू असून वीर पहाडिया सोबतचे तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर काही महिन्यांपूर्वी व्हायरल देखील झाले होते. सारा आणि वीर यांचे हे फोटो पाहिल्यानंतर ते लवकरच अधिकृतपणे त्यांच्या नात्याची घोषणा करतील असे सगळ्यांना वाटत होते. पण त्यांनी एकमेकांच्या संमतीने हे नाते संपवण्याचा निर्णय घेतला. २०१७ मध्ये त्या दोघांचे ब्रेकअप झाले. पण ते नुकतेच दोघे एकमेकांच्या समोर आले होते.

स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटाचे स्क्रीनिंग बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींच्या उपस्थितीत झाले. सारा आणि अनन्या पांडे या एकमेकींच्या खूप चांगल्या फ्रेंड्स आहेत. पण त्याचसोबत अनन्याची वीरसोबत देखील चांगली मैत्री आहे आणि त्याचमुळे तिने आपल्या पहिल्या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला आपल्या या दोन्ही फ्रेंड्सना बोलावले होते. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार वीर चित्रपटगृहात गेल्यावर त्याची सीट शोधत असताना त्याचे साराकडे लक्ष गेले. पण त्या दोघांनीही एकमेकांकडे न बघणेच पसंत केले. एवढेच नव्हे तर चित्रपट संपल्यानंतर सारा लगेचच चित्रपटगृहातून निघून गेली. 

Web Title: Sara Ali Khan ignores former lover Veer Meet at student of the year 2's screening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.