बॉलिवूड अभिनेत्रा सारा आली खान नेहमी जिमबाहेर पत्रकार व चाहत्यांना भेटत असते. यादरम्यान ती तिच्या चाहत्यांसोबत फोटोदेखील क्लिक करत असते. मात्र यावेळी एका चाहत्यांचा कारनामा पाहून सारा हैराण झाली. इतकेच नाही तर तिला थांबवण्यासाठी साराच्या बॉडीगार्डला पुढे यावे लागले.


खरेतर सध्या सोशल मीडियावर सारा अली खानचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत सारा जिमच्या बाहेर पत्रकार व चाहत्यांना भेटताना दिसते आहे. यादरम्यान साराने चाहत्यांसोबत सेल्फीदेखील काढली. मात्र या चाहत्यांमधील एक चाहता भेटण्यासाठी पुढे आला आणि हात मिळवण्याऐवजी तिच्या हातावर किस करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या सुरक्षारक्षकांनी त्या व्यक्तीला लगेच दम भरला. मात्र हा सगळा प्रकार पाहून सारा हैराण झाली.


सारा अली खान नुकतीच मालदीवमधून सुट्टी एन्जॉय करून भारतात परतली आहे. तिच्यासोबत आई अमृता सिंग व इब्राहिम अली खानदेखील मालदीवला गेले होते.

यादरम्यान आई व भावासोबत तिने खूप एन्जॉय केलं. यावेळचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.


साराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती वरूण धवनसोबत 'कुली नंबर१'च्या रिमेकमध्ये झळकणार आहे.

Read in English

Web Title: Sara Ali Khan Get Shocked When Her Fan Tries To Kissed Her Hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.