sara ali khan cute video viral on social media |  अन् फोटोग्राफर्स दिसताच सारा अली खानने ठोकली धूम, पाहा व्हिडीओ

 अन् फोटोग्राफर्स दिसताच सारा अली खानने ठोकली धूम, पाहा व्हिडीओ

ठळक मुद्दे सध्या सारा  ‘कुली नंबर वन’च्या रिमेकचे शूटींग करतेय.

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान गेल्या काही दिवसांपासून तिच्या लव्हलाईफमुळे चर्चेत होती. कार्तिक आर्यनसोबतच्या तिच्या अफेअरच्या चर्चा जोरात होत्या. पण अचानक दोघांचे ब्रेकअप झाले आणि सारा व कार्तिकच्या लव्हस्टोरीला ब्रेक लागला. सध्या सारा एका व्हिडीओमुळे  चर्चेत आहे. होय, साराचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. यात सारा फोटोग्राफर्सपासून स्वत:ला वाचवत पळताना दिसतेय.
तूर्तास सारा ‘कुली नंबर 1’च्या रिमेकमध्ये बिझी आहे. अशातही वेळात वेळ काढून ती सलूनमध्ये पोहोचली आणि फोटोग्राफर्सनी तिला घेरले. पण चाणाक्ष सारा फोटोग्राफर्सच्या गराड्यातून हळूच बाहेर पडली आणि नंतर तिने धूम ठोकली.

छायाचित्रकारांनी साराला आवाज दिल्यावर तिने मागे वळून पाहिले आणि नेहमीप्रमाणे हसत हसत सगळ्यांना बाय केले. तिचा हा क्यूट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर  व्हायरल होत आहे. यावेळी साराने ब्लॅक अँड व्हाइट रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. छायाचित्रकार योगेन शहाने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला. साराचे चाहते या व्हिडीओवर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.


 सध्या सारा  ‘कुली नंबर वन’च्या रिमेकचे शूटींग करतेय. या चित्रपटात तिच्या अपोझिट वरूण धवन दिसणार आहे. याशिवाय तिचा आणि  कार्तिक आर्यनसोबत ‘लव आजकल 2’ हा सिनेमाही येत्या दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: sara ali khan cute video viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.