ठळक मुद्देसाराच्या या पोस्टवर वरूण धवनने कमेंट केली आहे.

सारा अली खान तिच्या जॉली नेचरसाठी ओळखली जाते. दुस-यांची मजा तर ती घेतेच. पण स्वत:च स्वत:ची खिल्ली उडवायलाही घाबरत नाही. साराची ताजी पोस्ट वाचून तुम्हालाही याची खात्री पटेल. होय, साराने इन्टाग्रामवर एक मजेशीर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टचे कॅप्शन वाचून तुम्हीही हसाल.
होय, साराने इन्स्टावर एक ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट फोटो शेअर केला आहे. हा फोटो चाहत्यांचे लक्ष वेधणारा आहे, यात शंका नाही. पण त्याहीपेक्षा या फोटोला दिलेले कॅप्शन अधिक लक्षवेधी आहे. होय, हे कॅप्शन तुम्हाला हसायला भाग पाडेल.

इन आँखों की मस्ती 👀

Rekha Ji se hai Sara bahut सस्ती 💵
Luckily, voh apne aap pe hi हस्ती 😂
She says all this and then voh फस्ती
’ ,असे ‘शायराना’अंदाजात साराने हा फोटो शेअर करताना लिहिले आहे.

सध्या सारा  ‘कुली नंबर वन’च्या रिमेकचे शूटींग करतेय. या चित्रपटात तिच्या अपोझिट वरूण धवन दिसणार आहे. याशिवाय तिचा आणि  कार्तिक आर्यनसोबत ‘लव आजकल 2’ हा सिनेमाही येत्या दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान गेल्या काही दिवसांपासून तिच्या लव्हलाईफमुळे चर्चेत होती. कार्तिक आर्यनसोबतच्या तिच्या अफेअरच्या चर्चा जोरात होत्या. पण अचानक दोघांचे ब्रेकअप झाले आणि सारा व कार्तिकच्या लव्हस्टोरीला ब्रेक लागला.

वरूणने घेतली मजा
साराच्या या पोस्टवर वरूण धवनने कमेंट केली आहे. तुझ्याकडे खूप मोकळा वेळ दिसतो, असे त्याने साराच्या या फोटोवर कमेंट देताना लिहिले आहे.


 

Web Title: sara ali khan calls herself sasti rekha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.