Video : बॉडीगार्डनं असं काही केलं की सारा अली खानला मागावी लागली माफी  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 10:24 AM2021-11-30T10:24:57+5:302021-11-30T10:25:20+5:30

होय,  अली खानच्या  बॉडीगार्डनं असं काही केलं की, त्याबद्दल साराला माफी मागावी लागली. आता हे संपूर्ण प्रकरण काय तर ते जाणून घेऊ.

sara ali khan apologizes on behalf of her security guard netizens call her sweet | Video : बॉडीगार्डनं असं काही केलं की सारा अली खानला मागावी लागली माफी  

Video : बॉडीगार्डनं असं काही केलं की सारा अली खानला मागावी लागली माफी  

Next

अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) तिच्या विनम्र स्वभावासाठी ओळखली जाते. विशेषत: मीडियासोबत ती अतिशय अदबीनं वागताना दिसते. पण सोमवारी एक इव्हेंट संपवून कारमध्ये बसत असताना असं काही घडलं की, सारा अली संतापली. होय,  अली खानच्या  बॉडीगार्डनं असं काही केलं की, त्याबद्दल साराला माफी मागावी लागली.  आता हे संपूर्ण प्रकरण काय तर ते जाणून घेऊ.
तर सारा तिच्या ‘अतरंगी रे’ या सिनेमाच्या ‘चका चक’ या पहिल्या गाण्याच्या लॉन्च इव्हेंटला पोहोचली होती.  इव्हेंट संपला आणि सारा कारकडे निघाली.  कार्यक्रम संपल्यानंतर सारा तिच्या कारकडे जात होती आणि यादरम्यान तिच्या एका सिक्युरिटी गार्डने एका पापाराझीला धक्का मारून खाली पाडलं. साराला हे कळलं तेव्हा ती नाराज झाली.

गाडी बसण्यापूर्वी,आजूबाजूला उभ्या असलेल्या पापाराझींची तिनं माफी मागितली. कोणाला पाडलं, ते  कुठे आहेत, असं विचारत  त्यांना माझ्याकडून सॉरी म्हणा, असं सारा म्हणताना व्हिडीओत दिसतेय. यानंतर ती सुरक्षा रक्षकांना समजावते. प्लीज, असं परत करू नका. कृपा करून कधीही कोणालाही धक्का नका देऊ. इतकंच नाही  स्वत: आपल्या बॉडिगार्डच्यावतीने माफी मागते आणि असं परत नाही होणार असं आश्वासन देते. 
साराचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. या प्रकरणावर नेटिझन्स साराचे खूप कौतुक करत आहेत.  
सारा अली खानचा ‘अतरंगी रे’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. धनुष आणि अक्षय कुमारसोबत ती या चित्रपटात दिसणार आहे. आनंद एल राय यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात सारा ही बिहारी मुलगी बनली आहे.  ‘अतरंगी रे’ 24 डिसेंबरला   डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

Read in English

Web Title: sara ali khan apologizes on behalf of her security guard netizens call her sweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app