कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांच्या बहुचर्चित 'लव्ह आज कल' सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. हा सिनेमा येत्या फेब्रुवारीमध्ये व्हॅलेंटाइन डेला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण त्याआधी सिनेमाच्या ट्रेलर लाँचवेळी सारा समोर कार्तिकनं त्याच्या व्हॅलेंटाइन डेचा प्लान शेअर केला आहे. सारा व कार्तिकचा हा व्हिडिओ चाहत्यांमध्ये खूप व्हायरल होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून सारा तिच्या चित्रपटांपेक्षा पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. होय, कार्तिक आर्यनसोबतच्या तिच्या अफेअरच्या चर्चा सध्या बी-टाऊनमध्ये जोरात आहेत. मात्र काही दिवसांपासून त्या दोघांचं ब्रेकअप झाल्याचं समोर आलं आहे. पण तरीही आता सिनेमाच्या प्रमोशनसाठी हे दोघंही मतभेद विसरुन एकत्र आले आहेत.
ट्रेलर लाँचवेळी कार्तिकला व्हॅलेंटाइन डेच्या प्लानबद्दल विचारले. तेव्हा कार्तिकच्या आधी या प्रश्नाचं उत्तर सारानं दिलं. सारा म्हणाली उत्तर तर इथे आहे, लव्ह आज कल पाहणार आहे अजून काय करणार. 


हाच प्रश्न कार्तिकला पुन्हा एकदा विचारण्यात आल्यावर सारानं त्याला तोडत मध्येच म्हटलं, तो येणार नाही का? त्याला तुम्ही असं का विचारत आहात. त्यानंतर कार्तिककडे वळून त्याला विचारते, नाही येणार का तू? त्यावर कार्तिक म्हणतो, एकत्र? आपण दोघं डेटवर जाणार का? यावर सारा म्हणते. आपला सिनेमा आहे. माझ्यासोबत नाही तर कोणासोबत जाणार. त्यांच्या या म्हणण्यावर सर्व हसू लागतात.


त्यानंतर कार्तिक म्हणाला की, हो आम्ही दोघंही चित्रपट पाहायला जाणार आहोत त्या रात्री आणि त्याच्या आदल्या रात्री सुद्धा. ही आमची डेट नाइट असेल. 


'लव्ह आज कल'मध्ये सारा, कार्तिकशिवाय रणदीप हुड्डा, आरुषी शर्मादेखील मुख्य भूमिकेत आहेत. २००९ मध्ये आलेल्या सैफ अली खान आणि दीपिका पदुकोणच्या 'लव्ह आज कल' चित्रपटाचा हा दुसरा सीक्वल आहे.

येत्या १४ फेब्रुवारी रोजी 'लव्ह आज कल' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Sara Ali Khan and Kartik Aryan told about Valentine day plan, Video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.