ठळक मुद्देसारा या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान कार्तिकला भेटायला लखनऊला गेली असून त्यांच्या याच भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कार्तिक आर्यन आणि छोटे नबाव सैफ अली खानची लेक अभिनेत्री सारा अली खानच्या अफेअरच्या चर्चा रंगल्यात. पुन्हा एकदा दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. इम्तियाज अलीचा सिनेमा 'लव्ह आज कल 2'च्या सेटवर दोघांच्या बॉन्डिंग विषयीच्या चर्चा ऐकायला मिळायच्या. आता शूटिंग संपल्यानंतरही हे दोघे एकमेकांच्या संपर्कात आहेत. आता तर कार्तिकला भेटण्यासाठी साराने थेट लखनऊ गाठले आहे.

सारा आणि कार्तिकचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोत दोघे हातात हात घालून उभे असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. हा फोटो कार्तिक आणि साराच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असून हा फोटो पाहून त्या दोघांमध्ये मैत्रीपेक्षा अधिक काही तरी असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा ऊत आले आहे. 'लव्ह आज कल 2' या चित्रपटाच्या चित्रीकरणानंतर आता कार्तिक त्याच्या ‘पति पत्नी और वो’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत असून या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या लखनऊमध्ये सुरू आहे. सारा या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान कार्तिकला भेटायला लखनऊला गेली असून त्यांच्या याच भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. साराला कार्तिकचा दुरावा सहन होत नाहीये असेच या फोटोतून त्याच्या चाहत्यांना वाटत आहे आणि हा फोटो पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का देखील बसत आहे.

काही दिवसांपूर्वी कार्तिक मुंबईच्या बाहेर जात असताना सारा त्याला आपल्या गाडीतून ड्रॉप करण्यासाठी गेली होती. तसेच 'लव्ह आज कल 2' या चित्रपटाच्या चित्रीकरणातून मिळणाऱ्या मोकळ्या वेळात सारा आणि कार्तिक एकत्र फिरत असताना पाहायला मिळत होते. 

'कॉफी विद करण' या शोमध्ये साराने कार्तिकवर क्रश असून त्याला डेट करायला आवडेल असे म्हटले होते. तेव्हापासूनच या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं. मात्र कार्तिक अजूनही आपण सिंगल असल्याचं सांगतोय. शिवाय लवकरच मिंगल व्हायला आवडेल हे सांगायलाही तो विसरत नाही. 


Web Title: Sara Ali Khan and Kartik Aaryan hold hands in Lucknow
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.