ठळक मुद्दे सारा व इब्राहिम हे सैफ अली खान व अमृता सिंग यांची मुले आहेत. इब्राहिम अगदी सैफ सारखा दिसतो.

सैफ अली खानची लेक सारा अली खान आणि मुलगा इब्राहिम अली खान सध्या चर्चेत आहेत. कारण आहे सारा व इब्राहिमचे फोटोशूट. होय, सारा व इब्राहिम या बहिण-भावाने नुकतेच एका मॅगझिनसाठी फोटोशूट केले. या फोटोशूटचे फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे, साराने स्वत: या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोबत व्हिडीओही आहे. यात सारा व इब्राहिम एकापेक्षा एक भारी पोज देताना दिसत आहेत.


सारा अली खानने ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. यात सुशांत सिंग राजपूत तिचा हिरो होता. पहिल्याच चित्रपटात भाव खाऊन गेलेल्या साराला लगेच दुस-या सिनेमात रणवीर सिंगसोबत काम करण्याची संधी मिळाली. तिचा व रणवीरचा ‘सिम्बा’ तुफान गाजला.

लवकरच ‘लव्ह आज कल 2’ या चित्रपटात ती दिसणार आहे. एकंदर काय तर साराने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपली जागा निर्माण केली. आता तिचा भाऊ इब्राहिम बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार, अशी चर्चा आहे.

अर्थात अद्याप इब्राहिमने अद्याप याबद्दल कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण हो, हे फोटोशूट पाहता इब्राहिमच्या डेब्यूची तयारी सुरु झालीय, असे समजायला हरकत नाही.

सैफ इब्राहिमसाठी एक चित्रपट प्रोड्यूस करणार असल्याची मध्यंतरी बातमी होती. अद्याप या चित्रपटाबद्दलचा तपशील कळू शकला नाही. पण इब्राहिमला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याचा पापा सैफचा इरादा मात्र पक्का असल्याचे कळतेय.
सारा व इब्राहिम हे सैफ अली खान व अमृता सिंग यांची मुले आहेत. इब्राहिम अगदी सैफ सारखा दिसतो.

Web Title: Sara ali khan and Ibrahim Ali Khan Look Stunning in Their First Ever Magazine Photoshoot Together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.