sanjay leela bhansali announce to make film baiju bawra after releasing gangubai kathiawadi | भन्साळींनी केली ‘बैजू बावरा’ची घोषणा, 90 च्या दशकाचा हा सुपरस्टार साकारणार मुख्य भूमिका!!
भन्साळींनी केली ‘बैजू बावरा’ची घोषणा, 90 च्या दशकाचा हा सुपरस्टार साकारणार मुख्य भूमिका!!

ठळक मुद्देभन्साळींच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या सिनेमात अजय देवगण दिसला होता.

संजय लीला भन्साळी हे त्यांच्या लार्जर दॅन लाईफ चित्रपटांसाठी ओळखले जातात. अलीकडे भन्साळींनी ‘इंशाअल्लाह’ या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटासाठी सलमान खान व आलिया भट यांनाही साईन करण्यात आले होते. पण अचानक भन्साळींनी हा प्रोजेक्ट बंद केला आणि चाहत्यांची निराशा झाली. पण आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, भन्साळींनी दोन नव्या चित्रपटांची घोषणा केली आहे. काल दिवाळीच्या मुहूर्तावर भन्साळींनी ‘गंगुबाई काठीयावाडी’ आणि ‘बैजू बावरा’ या दोन चित्रपटांची घोषणा केली.

‘गंगुबाई काठीयावाडी’  रिलीज झाल्यानंतर भन्साळींचा ‘बैजू बावरा’ हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. ‘गंगुबाई काठीयावाडी’  हा सप्टेंबर 2020 मध्ये प्रदर्शित होणार आहे. तर ‘बैजू बावरा’ 2021 मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटागृहांत येणार आहे. 

अद्याप भन्साळींनी या चित्रपटाच्या स्टारकास्टची घोषणा केलेली नाही. पण तूर्तास ‘गंगुबाई काठीयावाडी’ या चित्रपटासाठी आलिया भटचे नाव चर्चेत आहे. तर ‘बैजू बावरा’ या चित्रपटासाठी भन्साळींचा ऑल टाईम फेवरेट अभिनेता अजय देवगणची वर्णी लागल्याचे मानले जात आहे. भन्साळींच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या सिनेमात अजय देवगण दिसला होता. असे म्हणतात की, या चित्रपटानंतर भन्साळींनी अजयला ‘पद्मावत’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटांचीही ऑफर दिली होती. पण बिझी असल्याने अजयने या दोन्ही चित्रपटांना नकार दिला होता. मात्र आता ‘बैजू बावरा’च्या निमित्ताने अजय व भन्साळींची जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करणार असे मानले जात आहे.
2021 च्या दिवाळीला दीपिका पादुकोणचा ‘महाभारत पार्ट 1’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. यात दीपिका द्रौपदीची भूमिका साकारणार आहे. भन्साळींनीही 2021 च्या दिवाळीचे मुहूर्त निवडले आहेत. अशात या दोन चित्रपटाचा बॉक्स ऑफिस संघर्ष कसा रंगतो हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.

Web Title: sanjay leela bhansali announce to make film baiju bawra after releasing gangubai kathiawadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.