ठळक मुद्देमी एकावेळी दोन नव्हे तर तीन मुलींना एकत्र डेट केले होते. पण मी एकावेळी तीनजणींना डेट करत आहे हे तिघींना देखील कळले नव्हते. तुम्ही खूप हुशार असाल... आणि एकीला दुसरीसोबत काय सुरू आहे याची माहिती नसेल तर तुम्ही हे नक्कीच करू शकता...

संजय दत्त त्याच्या खऱ्या आयुष्यात कसा होता हे आपल्याला संजू या चित्रपटात पाहायला मिळाले. हा चित्रपट प्रेक्षकांना गेल्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचे खूपच चांगले प्रेम मिळाले. या चित्रपटाद्वारे संजय दत्तविषयी त्याच्या फॅन्सना अधिक जाणून घेता आहे. संजय दत्तच्या अनेक प्रेयसी होत्या असा या चित्रपटात देखील उल्लेख करण्यात आला आहे. 

संजय दत्तचे मान्यता दत्तसोबत लग्न झालेले असून तो त्याच्या आयुष्यात प्रचंड खूश आहे. त्यांना दोन मुले देखील आहे. संजयचे पहिले लग्न रिचा शर्मासोबत झाले होते. त्रिशाला ही संजय आणि रिचा यांची मुलगी असून रिचाच्या निधनानंतर काही वर्षांनंतर त्याने रिया पिल्लईसोबत लग्न केले. पण हे लग्न काहीच वर्षं टिकले. रियासोबत घटस्फोट झाल्यानंतर मान्यता त्याच्या आयुष्यात आली. संजय आणि मान्यता यांनी काहीच वर्षांच्या नात्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला.

संजय दत्तने इंडिया टुडेला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत त्याने एकावेळी एक नव्हे तर तो एकाचवेळी तीन मुलींना डेट करत होता अशी त्याने कबुली दिली होती. तू कधी दोन मुलींना एकत्र डेट केले आहेस का असे संजयला या मुलाखतीत विचारण्यात आले होते. त्याचे हे उत्तर ऐकून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्याने सांगितले होते की, मी एकावेळी दोन नव्हे तर तीन मुलींना एकत्र डेट केले होते. पण मी एकावेळी तीनजणींना डेट करत आहे हे तिघींना देखील कळले नव्हते. तुम्ही खूप हुशार असाल... आणि एकीला दुसरीसोबत काय सुरू आहे याची माहिती नसेल तर तुम्ही हे नक्कीच करू शकता... असे त्याने या मुलाखतीत सांगितले होते.

संजयच्या प्लेबॉय इमेजविषयी देखील या मुलाखतीत त्याला विचारण्यात आले होते. त्यावर त्याने सांगितले होते की, लोकांनी तुमच्यावर प्रेम केलेले नक्कीच तुम्हाला आवडते आणि त्यातही महिला तुमच्यावर प्रेम करत असतील तर ते तुम्हाला अधिक आवडते. 

Web Title: Sanjay Dutt was Once Dating Three Women All At Once, Revealed How He Managed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.