ठळक मुद्दे  संजयच्या ‘पानिपत’ या आगामी सिनेमाबद्दल सांगायचे झाल्यास, हा सिनेमा येत्या 6 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

‘संजू’ या चित्रपटात संजय दत्तच्या खासगी आयुष्याबद्दलचे अनेक खुलासे करण्यात आले. संजयचे ड्रग्जचे व्यसन ते त्याच्या गर्लफ्रेन्ड अशा अनेक बाबींचा खुलासा या चित्रपटात झाला. संजय दत्तला 308 गर्लफ्रेन्ड होत्या, हेही या चित्रपटातून उघड झाले होते. पण येत्या काळात हा आकडा 309 वर पोहोचू शकतो. होय, साठी ओलांडलेला संजूबाबा स्वत:पेक्षा 31 वर्षे लहान अभिनेत्रीला त्याची 309 वी गर्लफ्रेन्ड बनवू इच्छितो. खुद्द संजूबाबाने तसा खुलासा केला आहे.


संजय दत्त लवकरच आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत’ या चित्रपटात दिसणार आहे.  या चित्रपटात अभिनेता अर्जुन कपूर, संजय कपूर आणि अभिनेत्री क्रिती सॅनन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या या चित्रपटाचे धडाक्यात प्रमोशन सुरु आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी संजय दत्त नुकताच ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहोचला. यावेळी त्याने हा खुलासा केला.


कपिलने संजयला त्याच्या 308 गर्लफ्रेन्डबद्दल विचारले. यावर संजयने अतिशय मजेशीर उत्तर दिले. ‘माझ्या गर्लफ्रेन्डचा आकडा मी मोजत असतो. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण माझे आयुष्य अजून संपलेले नाही. पानिपत या चित्रपटातील क्रितीच्या कामाने मी प्रचंड प्रभावित झालो आहे. ती नक्कीच माझी 309 वी गर्लफ्रेन्ड बनू शकते,’ असे संजूबाबा म्हणाला. त्याचे हे उत्तर ऐकून सगळेच हसायला लागले. 


संजय दत्त सध्या 60 वर्षांचा आहे. फिल्मी करिअर करताना संजयचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले. या यादीत टीना मुनीम आणि माधुरी दीक्षित यांचीही नावे आहेत.  


 संजयच्या ‘पानिपत’ या आगामी सिनेमाबद्दल सांगायचे झाल्यास, हा सिनेमा येत्या 6 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. अर्जुन कपूर यात सदाशिवराव भाऊंची भूमिका साकारणार आहे तर क्रिती सॅनान पार्वती बार्इंच्या भूमिकेत दिसणार आहे. संजय दत्त अहमद शाह अब्दालीची भूमिका वठवणार आहे. 

Web Title: sanjay dutt wants to make kriti sanon his girlfriend revealed in kapil sharma show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.