sanjay dutt threatened by his sister namrata and priya to keep distance from aishwarya rai PSC | ऐश्वर्या रायपासून दूर राहा, संजय दत्तला मिळाली होती धमकी, धमकी देणाऱ्याचे नाव वाचून बसेल धक्का

ऐश्वर्या रायपासून दूर राहा, संजय दत्तला मिळाली होती धमकी, धमकी देणाऱ्याचे नाव वाचून बसेल धक्का

ठळक मुद्देसंजय दत्तची बहीण नम्रता आणि प्रिया दोघांना ऐश्वर्या इतकी आवडते की, तिच्यासाठी त्यांनी संजय दत्तला धमकी देखील दिली होती.

ऐश्वर्या रायला सौंदर्याची खाणच म्हटले जाते. सामान्य लोकच नव्हे तर सेलिब्रेटीदेखील तिच्या सौंदर्यावर फिदा आहेत. संजय दत्तची बहीण नम्रता आणि प्रिया दोघांना ऐश्वर्या इतकी आवडते की, तिच्यासाठी त्यांनी संजय दत्तला धमकी देखील दिली होती. संजय दत्तने एका मुलाखतीत याविषयी सांगितले होते.

संजय दत्त आणि ऐश्वर्या यांनी शब्द, हम किसी से कम नही यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. संजय आणि ऐश्वर्याच्या जोडीला हिट चित्रपट देता आले नसले तरी खाजगी आयुष्यात त्यांची चांगली मैत्री आहे. दोघांनी चित्रपटांमध्ये एकत्र काम करण्याआधी एका मासिकाच्या कव्हर पेजसाठी शूट केले होते. त्यावेळेचा मजेदार किस्सा संजयने एका मुलाखतीत सांगितला होता.

संजयने या मुलाखतीत सांगितले होते की, हा १९९३ चा काळ होता. त्यावेळी ऐश्वर्याने चित्रपटसृष्टीतील तिच्या प्रवासाला देखील सुरुवात केली नव्हती. एवढेच काय तर ती मिस वर्ल्ड देखील बनली नव्हती. पण ती एक प्रसिद्ध मॉडेल होती आणि तिच्या सौंदर्याची त्याकाळात देखील चांगलीच चर्चा होती. तिने त्यावेळी पेप्सीच्या जाहिरातीत काम केले होते. तिला पाहाताच तिच्या सौंदर्याची मी तारीफ केली होती. नम्रता आणि प्रियाला तर ऐश्वर्या प्रचंड आवडायची. त्यामुळे तिच्यासोबत फोटोशूट  करण्याआधीच मला त्या दोघींनी धमकी दिली होती की, तिला पटवण्याचा विचारसुद्धा करू नकोस.... काम करताना तू तिचा नंबर घ्यायचा नाहीये की तू तिला कोणतीही भेटवस्तू देखील द्यायची नाहीये.  

ऐश्वर्याचा जन्म कर्नाटकातील मंगळूरचा. ऐश्वर्याच्या जन्मानंतर राय कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. ऐश्वयाचे अख्खे बालपण मुंबईत गेले आणि याच मुंबईत राहून तिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. अगदी जगतसुंदरीचा किताब जिंकण्यापासून तर बॉलिवूड, हॉलिवूडची अभिनेत्री म्हणून मिरवण्यापर्यंत आणि कान्सच्या रेड कार्पेटवर मिरवण्यापर्यंतचा तिचा प्रवास डोळे दिपवणारा आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: sanjay dutt threatened by his sister namrata and priya to keep distance from aishwarya rai PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.