संजय दत्त सध्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. या व्हिडिओत संजय दत्त कोणत्यातरी मुलीला लपून छपून प्रेम व्यक्त करताना दिसतो आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओत संजय दत्त ज्या मुलीच्या प्रेमात पडला आहे त्या मुलीचं नाव आहे पूजा.

संजय दत्तचा प्रेम व्यक्त करतानाचा व्हिडिओ एकता कपूरनं इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. एकता कपूरने हा व्हिडिओ शेअर करून लिहिलं की,'मुन्नाभाई देखील उत्सुक आहे ड्रीम गर्ल पूजाला भेटण्यासाठी. फक्त चार दिवस बाकी आहेत.' या व्हिडिओत पहायला मिळतंय की फोनची रिंग वाजते आहे आणि संजय दत्त फोन उचलून कोणत्यातरी मुलीशी बोलतो आहे. तो त्या मुलीला बोलतोय की पूजा कधी भेटणार आहेस... नक्की १३ तारीख ना. त्यानंतर संजय पूजाला फोनवर आय लव यू बोलताना दिसला.

तुम्हाला प्रश्न पडला असेल ना ही पूजा आहे तरी कोण? खरंतर आयुषमान खुराना आगामी चित्रपट ड्रीम गर्लमध्ये पूजा नामक मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी एकता कपूरने ही शक्कल लढवली आहे.
 'ड्रीम गर्ल' चित्रपटात आयुषमान पुरूषांशी मुलीच्या आवाजात बोलताना दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूरने केली आहे. हा चित्रपट १३ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


संजय दत्तच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर त्याचा 'प्रस्थानम' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तेलगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन देवा कट्टाने केले आहे. हा चित्रपट २० सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

 

Web Title: Sanjay Dutt promotes dream girl movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.