sanjay dutt post a notice that he is taking short break from movies for medical treatment | उपचारांसाठी कामातून ब्रेक घेत आहे, लवकरच परत येईन...! संजय दत्तच्या ट्विटने वाढवली चाहत्यांची चिंता

उपचारांसाठी कामातून ब्रेक घेत आहे, लवकरच परत येईन...! संजय दत्तच्या ट्विटने वाढवली चाहत्यांची चिंता

ठळक मुद्देसंजय दत्तने शनिवारी रात्री ट्विट करत त्याच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती दिली होती.

अभिनेता संजय दत्त सध्या आजारी आहे. गेल्या शनिवारी श्वसनास त्रास जाणवू लागल्यानंतर संजयला मुंबईच्या लीलावती रूग्णालयात भरती करण्यात आले होते. यामुळे संजूबाबाच्या चाहत्यांच्या चिंता वाढल्या होत्या. अर्थात दोन दिवसांच्या उपचारानंतर संजयला रूग्णालयातून  डिस्चार्ज मिळाल्याचे पाहून चाहते सुखावले होते. मात्र आता संजूबाबाच्या एका ट्विटने चाहते पुन्हा अस्वस्थ झाले आहेत. होय, उपचारांसाठी काही वेळासाठी कामातून ब्रेक घेत असल्याचे ट्विट संजयने केले आहे.

‘नमस्कार मित्रांनो, काही वैद्यकीय उपचारांसाठी मी कामापासून छोटा ब्रेक घेत आहे. माझे कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणी माझ्यासोबत असून माझ्या प्रकृतीविषयी चिंता करू नका. त्याचप्रमाणे तब्येतीविषयी काही अफवा पसरवू नका. तुमच्या प्रेमाच्या आणि शुभेच्छांच्या आधारे मी लवकरच परत येईन’, असे ट्विट संजय दत्तने केले आहे.
संजय दत्तने उपचारासाठी ब्रेक घेतला. पण कुठल्या आजारावरचे उपचार, याचा खुलासा त्याने केलेला नाही. यामुळे चाहत्यांच्या चिंता वाढल्या आहेत. तूर्तास संजय लवकर बरा व्हावा, यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.


 
संजय दत्तने शनिवारी रात्री ट्विट करत त्याच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती दिली होती. त्याचप्रमाणे दोन-तीन दिवसांत घरी परतणार असल्याचेही त्याने या ट्विटमध्ये सांगितले होते. यानंतर संजयला कोरोना झाल्याची अफवा पसरली होती. संजयची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली होती.  
तूर्तास संजय केजीएफ 2 या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. यात तो कन्नड सुपरस्टार यशसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

Read in English

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: sanjay dutt post a notice that he is taking short break from movies for medical treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.