ठळक मुद्देयावर्षी ऑगस्ट महिन्यातच संजय दत्तने सोशल मीडियावर आपल्या आजाराबाबत माहिती दिली होती.

संजय दत्तला कॅन्सर झाल्याचे निदान होताच कुटुंबासोबतच चाहतेही बाबाच्या काळजीने चिंतीत होते. पण बाबाची इच्छाशक्ती जबरदस्त होती. मी कॅन्सरला हरवणारच, हा इरादा पक्का होता. त्यानुसार, संजूबाबाने कॅन्सरला मात दिली. नुकतीच  कॅन्सरमुक्त झाल्याची गोड बातमी त्याने चाहत्यांशी शेअर केली. या बातमीने चाहते सुखावले. कुटुंबात आनंद व समाधानाचे वातावरण पसरले. सध्या संजूबाबा आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतोय. याचदरम्यान त्याचे ताजे स्टाइलिश फोटो व्हायरल होत आहेत.

संजयच्या या नव्या लूकचे फोटो त्याचा हेअरस्टाइलिस्ट मित्र हाकिम आलिम याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात संजू शॉर्ट प्लॅटिनम ब्लॉन्ड हेअरस्टाइलमध्ये दिसतोय. दाढीसोबतचा त्याचा हा नवा लूक हिट झाला आहे.
फोटोंमध्ये संजयने डिझाईनर चश्मा आणि कानात स्टड घातले आहेत. ब्लू टी-शर्टमधील त्याच्या दंडावरचा टॅटूही स्पष्ट दिसतोय.

संजय दत्तने सोशल मीडियावर एक नोट शेअर करत कॅन्सरला मात दिल्याची बातमी दिली होती. ‘आज तुम्हा सर्वांसोबत ही बातमी शेअर करताना मला अतिशय आनंद होतोय.  गेले काही आठवडे माझ्यासाठी आणि माझा परिवारासाठी फार कठिण होते. पण ते म्हणतात ना, देव  सर्वात मजबूत शिपायालाच सर्वात कठिण लढाई देतो. आजमाझ्या मुलांच्या वाढदिवसाच्या दिवशी मी आनंदी आहे की, मी ही लढाई जिंकून परत आलो आहे. मी आज त्यांना सर्वात मोठे गिफ्ट देऊ शकलो, याचा मला आनंद आहे. हे सर्व तुमच्या विश्वासामुळे आणि पाठींब्याशिवाय शक्य नव्हते. तुमच्या प्रार्थनांमुळे मी या आजारावर मात करू शकलो.   मला इतके प्रेम आणि आशीर्वाद देण्यासाठी सर्वांचे आभार’, असे संजयने आपल्या या पोस्टमध्ये लिहिले होते.

यावर्षी ऑगस्ट महिन्यातच संजय दत्तने सोशल मीडियावर आपल्या आजाराबाबत माहिती दिली होती. त्यानंतर संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर असल्याचे निदान झाले होते.  

संजय दत्तच्या सिनेमात होणार बदल 
आजतकच्या रिपोर्टनुसार, संजय दत्तचा येणारा सिनेमा पृथ्वीराज आणि KFG2मध्ये बदल करण्यात येणार आहेत. आधी या  सिनेमात दमदार अ‍ॅक्शन सीन्स होते. ते  सीन्स करण्यासाठी तो फिजिकली फिट असण्याची आवश्यकता होती. मात्र आता असे नाही आहे, त्यामुळे सिनेमात काही आवश्यक बदल करण्यात येतील. KFG2 शिवाय संजय अक्षय कुमारसोबत पृथ्वीराजमध्ये सुद्धा दिसणार आहे. या चित्रपटात त्याला घोडेस्वारीपासून तलवारबाजीपर्यंत बरेच काही करायचे आहे.पण आता त्याची प्रकृती पाहता चित्रपटात काही बदल केले जाऊ शकतात. अशा परिस्थितीत संजय दत्त मोठ्या पडद्यावर आपली भूमिका साकारताना दिसणार आहे, पण कदाचित तो अ‍ॅक्शन सीन्स करणार नाही. 

संजय दत्तने कॅन्सरशी लढाई जिंकली पण अजूनही करू शकणार नाही 'हे' काम!

संजूबाबा कॅन्सरमुक्त झाल्याचे ऐकून ढसाढसा रडली पत्नी मान्यता, मित्राने केला खुलासा

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: sanjay dutt new blonde hair look is viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.