ठळक मुद्देमान्यता  संजय दत्तच्या प्रॉडक्शन हाऊसची सीईओ आहे. संजयचे सारे काम तीच सांभाळते.

संजय दत्त आणि मान्यता दत्त हे बॉलिवूडचे एक लोकप्रिय कपल आहे. मान्यतावरचे प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी संजू सोडत नाही. आता संजयने पत्नी मान्यतासाठी एक नाही चार फ्लॅट खरेदी करून ते तिला गिफ्ट म्हणून दिले. याची किंमत कोट्यावधीच्या घरात आहे.   विशेष म्हणजे, आठवडाभरात संजयने दिलेले हे महागडे गिफ्ट मान्यताने त्याला परतही केले. 
 मनीकंट्रोल डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, या चार फ्लॅटची किंमत जवळपास 100 कोटी रूपये आहे. ‘गिफ्ट डीड’ने मात्र या प्रॉपर्टीची किंमत 26.5 कोटी असल्याचे म्हटले आहे. हे चारही फ्लॅट पाली हिल्स भागात आहेत.

रिपोर्टनुसार, संजयने मान्यताला इंपिरियल हाऊस नामक एका अपार्टमेंटमधील चार फ्लॅट गिफ्ट म्हणून दिले. यापैकी दोन फ्लॅट तिसºया व चौथ्या माळ्यावर आहेत. तर दोन पेंटहाऊस 11 व 12 व्या माळ्यावर आहेत. या फ्लॅटसोबत 15 कार पार्किंगची जागा आणि दोन ओपन पार्किंगचा समावेश आहेत. डिसेंबर 2020 मध्ये संजयने मान्यताना हे चारही फ्लॅट भेट दिलेत. मात्र यानंतर आठवडाभरातच मान्यताने हे चारही फ्लॅट संजयला परत केलेत.

आता असे का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर काहींच्या मते, कागदपत्रांमध्ये काही तांत्रिक चुकीमुळे मान्यताने असे केले असावे तर काहींच्या मते, टॅक्समधील काही अडचणीमुळे तिला असे करावे लागले असावे.
  moneycontrol  कडे भेटींची दोन लेखी करारपत्रं उपलब्ध आहेत.  पाहिले लेखी करारपत्र संजय दत्तने 23 डिसेंबर 2020 रोजी केलेले आहे. कागदपत्रानुसार, मान्यताने हे फ्लॅट्स 29 डिसेंबर 2020 रोजी संजयला परत केले आहेत. प्रत्येकी 500 रुपये देऊन ही करारपत्रं केली गेली होती.

मान्यता  संजय दत्तच्या प्रॉडक्शन हाऊसची सीईओ आहे. संजयचे सारे काम तीच सांभाळते. प्रकाश झा यांच्या ‘गंगाजल’ या चित्रपटात ‘अल्हड जवानी’ हे आयटम सॉन्ग करून मान्यता प्रकाशझोतात आली होती.2008 साली संजयने मान्यतासोबत लग्न केले. पण या मान्यताचे खरे नाव कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल. तिचे खरे नाव आहे दिलनवाज शेख.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: sanjay dutt gifts wife rs 100 crore worth four apartments but maanayata dutt returns them know why

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.