Sanjay dutt flies to dubai with wife maanayata dutt | फुफ्फुसांच्या कॅन्सरवर उपचार सुरु असतानाच अचानक संजय दत्त आणि पत्नी मान्यता दुबईला रवाना? समोर आले हे कारण

फुफ्फुसांच्या कॅन्सरवर उपचार सुरु असतानाच अचानक संजय दत्त आणि पत्नी मान्यता दुबईला रवाना? समोर आले हे कारण

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त सध्या फुफ्फुसांच्या कॅन्सवर उपचार घेत आहे. संजय दत्तने किमो थेरपीचा पहिला राऊंड पूर्ण केला आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार पत्नी मान्यता दुबईला पोहोचली.  रिपोर्टनुसार 15 सप्टेंबरला संजय दत्त दुबईला रवाना झाली आहे. याआधी त्याने मुंबईतल्या हॉस्पिटलमध्ये किमो थेरपी केली होती. संजय दत्त पत्नी मान्यता सोबत चार्टर्ड फ्लाईटने मुलांना भेटण्यासाठी गेला. संजय दत्तची मुलं सध्या दुबईत आहेत. संजय दत्तला मुलांची खूप आठवण येत होती म्हणून तो दुबईला पोहोचला. संजय दत्त या आठवड्यात किंवा पुढच्या 10 दिवसांत मुंबईत परतण्याची शक्यता आहे. 

कॅन्सवर उपचार घेत असताना संजय दत्तने याचा परिणाम कामावर होऊ दिला नाही. त्याने शेमशेरच्या शूटिंग केले. रिपोर्टनुसार, संजय दत्तची शमशेराची दीड दिवसांची शूटिंग बाकी आहे.  सिनेमाचे रॅपअप शूट यशराज स्टुडिओमध्ये पूर्ण करण्यात आले. संजयचे दत्तचे राहिलेले पॅचवर्क पूर्ण करण्यात आले. तो शूटिंग एकटाच करत होता. या पॅचवर्कनंतर सिनेमाची शूटिंग पूर्ण झाली आहे. 

'रुक जाना नहीं तू कहीं हार के'
काही दिवसांपूर्वी मान्यता दत्तने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने संजय दत्तचा एक फोटोही शेअर केलाय. मान्यताने संजय दत्तच्या फोटोसोबत लिहिले की, ''रुक जाना नहीं तू कहीं हार के... कांटों पे चलके मिलेंगे साए बहार के!! हमें अपनी जिंदगी के बुरे दिनों का सामने करके बेहतर दिनों को कमाना पड़ता है!! कभी हार नहीं मानना चाहिए!!'. तर मान्यताने  #inspiration #courage #strength #love #grace #positivity #dutts #challenging Yet #beautifullife #thankyougod या हॅशटॅगच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्यात.

कॅन्सरशी झुंज देताना संजय दत्तने केले शूटिंग, कॉन्ट्रॅक्टमधील अटींमध्ये अडकला अभिनेता ?

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sanjay dutt flies to dubai with wife maanayata dutt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.