ठळक मुद्देत्रिशालाने शेअर केलेल्या या फोटोत आपल्याला संजय दत्तची पहिली पत्नी रिचा शर्मा दिसत असून तिच्या हातात एक गोंडस बाळ दिसत आहे. हे बाळ दुसरे कोणीही नसून त्रिशाला आहे. तिने या फोटोसोबत आई आणि मी असे कॅप्शन लिहिले आहे.

संजय दत्तने आज बॉलिवूडमध्ये त्याच्या अभिनयावर त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. त्याच्या व्यवसायिक आयुष्याइतके त्याचे खाजगी आयष्य देखील चर्चेचा विषय बनले आहे. त्याच्या आयुष्यावर आधारित चित्रपट देखील प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. संजय दत्तच्या संजू या चित्रपटात त्याच्या खाजगी आयुष्यातील अनेक गोष्टींचा उल्लेख करण्यात आला असला तरी त्याच्या दोन पत्नींचा चित्रपटात कुठेच उल्लेख करण्यात आलेला नाही. एवढेच नव्हे तर त्याची मुलगी त्रिशालाचा देखील या चित्रपटात उल्लेख नाहीये. 

त्रिशाला ही सध्या परदेशात असून ती शिकत आहे. ती बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिने तिच्या आईचा एक जुना फोटो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तिच्या या फोटोवर संजयची बहीण प्रिया आणि त्याची पत्नी मान्यता या दोघींनी देखील कमेंट केले आहे. 

त्रिशालाने शेअर केलेल्या या फोटोत आपल्याला संजय दत्तची पहिली पत्नी रिचा शर्मा दिसत असून तिच्या हातात एक गोंडस बाळ दिसत आहे. हे बाळ दुसरे कोणीही नसून त्रिशाला आहे. तिने या फोटोसोबत आई आणि मी असे कॅप्शन लिहिले आहे. 

रिचाने देखील काही हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. संजय आणि रिचा यांचे लग्न 1987 मध्ये झाले. लग्नानंतर रिचाने बॉलिवूड इंडस्ट्रीला कायमचा रामराम ठोकला. लग्नाच्या काहीच वर्षांनंतर रिचाला कॅन्सरने ग्रासले आणि १९९६ मध्ये तिचे निधन झाले. रिचाच्या निधनानंतर संजयने रिया पिल्लईसोबत लग्न केले. पण हे लग्न काहीच वर्षं टिकले. रियासोबत घटस्फोट झाल्यानंतर मान्यता त्याच्या आयुष्यात आली. संजय आणि मान्यता यांनी काहीच वर्षांच्या नात्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. संजय आणि मान्यता त्यांच्या आयुष्यात प्रचंड खूश असून त्यांना दोन मुले देखील आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sanjay Dutt first wife Richa Sharma Looked Like This In 1988, The Year Daughter Trishala Was Born PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.