संजय दत्तची तिसरी पत्नी मान्यता दत्त सोशल मीडियावर कायम अ‍ॅक्टिव असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. नुकताच मान्यताने एक फोटो शेअर केला आहे, जो खूप व्हायरल होत आहे. मान्यताच्या या फोटोवर संजय दत्तची मुलगी त्रिशलानेही कमेंट केली आहे.त्रिशलाच्या कमेंटनेच लक्ष वेधून घेतले आहे.

नविन वर्षाच्या शुभेच्छा देताना मान्यताने तिचा हा फोटो शेअर केला होता. मान्यताच्या फोटोवर त्रिशलाच्या कमेंटमुळे या दोघांमध्ये असलेली बॉन्डींग जाणवते.   मान्यता आणि त्रिशलाच्या बॉन्डिंगविषयी बोलताना सुरुवातीला दोघांचे संबंध चांगले नव्हते. काळानुसार त्यांच्यामध्ये चांगले बॉन्डींग निर्माण झाल्याचे पाहायला मिळते. दोघेही एकमेकांच्या फोटोंवर कमेंट करतात आणि लाईक करतात.


एकदा मान्यताने त्रिशलाशी असलेल्या तिच्या नात्याबद्दल सांगितले होते - १२ वर्षांपूर्वी मी त्रिशलासाठी एक ऑन्टी होती. तिने मला तिच्या आयुष्यात आईचा दर्जा दिला नव्हता. मात्र जसजसे आम्ही एकमेकांना ओळखू लागलो. तसतसे आमचे नातेही घट्ट झाले. पूर्वी मी तिच्यासाठी केवळ आन्टी होती, आता ती मला तिचीसुद्धा आई मानते. हे मिळवणे  दोघांच्या समन्वयाने शक्य झाले की तिने मला आईचा हक्क दिला.

मान्यता पुढे म्हणाली - आता आई आणि मुलगी असे आमचे नाते बनले आहे. जे पूर्वीपेक्षा अधिक घट्ट झालं आहे, आम्ही दोघेही बर्‍याचदा मेसेज करतो किंवा एकमेकांना कॉल करतो सगळ्या घडामोडी शेअर करत असतो. मला त्रिशलाचा फार अभिमान आहे.मी नेहमीच तिची आभारी राहीन, तिने मला आई मानले, ज्याची मी वर्षानुवर्षे वाट पाहत होते. 

संजय दत्तची पहिली पत्नी रिचा शर्मा दोघांचे  लग्न 1987 मध्ये अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये झाले होते. लग्नाच्या काही वर्षानंतर, रिचाला कर्करोग झाल्याचे निदान झाले आणि 10 डिसेंबर 1996 रोजी रिचाने या जगाला निरोप दिला.

त्रिशला ही संजय दत्त आणि  रिचाची मुलगी आहे. ती अमेरिकेत राहते. जेव्हा तिची आई रिचाचे  निधन झाले तेव्हा त्रिशला अवघ्या 7 वर्षाची होती. आईच्या निधनानंतर त्रिशला तिच्या आजी आजोबांकडे अमेरिकेतच राहिली. 

रिचाच्या निधनानंतर संजयने रिया पिल्लईसोबत लग्न केले. पण हे लग्न काहीच वर्षं टिकले. रियासोबत घटस्फोट झाल्यानंतर मान्यता त्याच्या आयुष्यात आली. संजय आणि मान्यता यांनी काहीच वर्षांच्या नात्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. संजय आणि मान्यता त्यांच्या आयुष्यात प्रचंड खूश असून त्यांना दोन मुले देखील आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sanjay Dutt Daughter Trishala Comments On Step Mother Manyata Dutt's Glamorous Photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.