फुलराणी सायना नेहवालच्या जीवनावर सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. यात अभिनेत्री परिणिती चोप्रा प्रमुख भूमिका साकारणार आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार टेनिस प्लेअर सानिया मिर्झाच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. सानियाने एका इंटरव्हु सांगितले की रॉनी स्क्रूवाला यांनी तिच्या बायोपिकचे राईट्स विकत घेतले आहेत. तसेच तिची बेस्टफ्रेंड परिणीती चोप्रा यात मुख्य भूमिका साकारणार आहे. रिपोर्टनुसार सानियाने सांगितले की, परिणीती तिच्या बायोपिकमध्ये काम करणार नाही. कारण ती सानिया नेहवालच्या बायोपिकमध्ये काम करते आहे. इंडस्ट्रिमध्ये खूप सारे जमदार कलाकार आहेत. मला आशा आहे की ते माझी भूमिका सुरेखपणे पडद्यावर रेखाटतील.      


सायना नेहवाल्या बायोपिकसाठी परिणिती बराच घाम गाळते आहे. फिटनेस आणि ट्रेनिंगवर ती अधिक लक्ष देत आहे. मात्र काही दिवसांपूर्वी बॅडमिंटनचे धडे घेत असताना परिणितीला मोठी दुखापत झाली. यात तिचा खांदा दुखावला गेला. आता हळूहळू या दुखापतीमधून ती सावरत असून लवकरच पुन्हा एकदा बॅडमिंटन कोर्टवर या खेळाचे बारकावे शिकताना पाहायला मिळेल. मिळालेल्या माहितीनुसार या सिनेमात बॅडमिंटन खेळताना दाखवण्यासाठी परिणितीला कोणीही बॉडी डबल नसेल.


परिणितीच स्वतः बॅडमिंटन खेळतानाचे सीन करेल. सायना नेहवाल साकारताना परिणिती हुबेहूब तिच्यासारखीच वाटावी.शिवाय त्यात डुप्लिकेटकडून सीन चित्रित करुन कुठल्याही प्रकारची तडजोड करणं दिग्दर्शक अमोल कोल्हे यांना मान्य नाही.

Web Title: Sania mirza says parineeti chopra cant do her biopic because she is playing saina nehwal gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.