अभिनेत्री संगीता बिजलानीला दोनदा प्रेमात धोका मिळाला आहे  संगीताचे लग्न अभिनेता सलमान खानशी होणार होते मात्र ऐनवेळी तिला सलमानच्या अफेअरबाबत कळले आणि तिने नातं संपुष्टात आणले. 

यानंतर विवाहित क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनसोबत तिने लग्न केले पण लग्नाच्या 13 वर्षांनंतर दोघे वेगळे झाले. अझहरचे का बॅडमिंटन प्लेअरसोबत अफेअर सुरु होते ज्यानंतर संगीताने वेगळे होण्याच निर्णय घेतला. दोनदा प्रेमात विश्वासघात झाल्याममुळे संगीताचा प्रेमाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. यानंतर संगीताने रिलेशनशीपबाबत एक ब्लॉग लिहिला होता. ज्यामध्ये त्यानतिने  विवाहित जीवनाचे 'कटू सत्य' सांगितले होते. संगीताने तिच्या पर्सनल ब्लॉगला  'Married But not in the Marriage' असे टायटल दिले होते. 

विवाहबाह्य संबंधाबद्दल संगीताने ब्लॉगमध्ये आपले मत मांडले, त्याने लिहिलं होते की एखाद्या व्यक्तीला 'आपल्या जोडीदारामध्ये हव्या त्या गोष्टी मिळतात', तरीही तो समाधान आणि शांतीसाठी इतर पर्याय शोधतो. यानंतर 'पती, पत्नी आणि वो ची कथा' गोष्ट सुरू होते.संगीताने लिहिले होते की, अफेअरचा त्या व्यक्तीच्या सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीशी काही संबंध नाही.  पूर्वी अशा परिस्थिती विवाहित जोडप्यांमध्ये होत असत, फरक इतकाच की आजकाल लोक शांतपणे लपून बसण्याऐवजी त्याच्यावर बोलू लागले आहेत. असे सांगीताचे म्हणणे आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sangeeta bijlani divorce by mohammad azharuddin this is what she had written on marriage and affair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.