ठळक मुद्देसना खान ‘बिग बॉस’च्या सहाव्या सीझनमध्ये दिसली होती.

काही दिवसांपासून अभिनेत्री सना खानच्या अफेअरच्या बातम्या चर्चेत होत्या. होय, डॉन्स ट्रेनर मेल्विन लुईसला सना डेट करत होती. खुद्द सनाने अलीकडे याची कबुली दिली होती. पण आता लुईससोबत तिचे ब्रेकअप झाले आहे. ब्रेकअपनंतर सनाने एक बोल्ड फोटोशूट केले आहे.


ब्रेकअपचे दु:ख विसरण्यासाठी सना सध्या हॉलीडेवर गेलीय. जॉर्डन येथे ती सुट्टी एन्जॉय करतेय. तिचे हॉट फोटो जॉर्डनमधील आहेत.

या फोटोत सना जुन्या आठवणी विसरून मनसोक्त मस्ती करताना दिसतेय. सिल्व्हर ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

रेड आऊटफिटमधील तिचा अवतारही चाहत्यांना वेड लावणारा आहे. काही दिवसांपूर्वी सना व लुईसचे ब्रेकअप झाले. दोघांमध्ये अनेक मतभेदाचे मुद्दे होते. दोघेही हे मतभेद दूर करण्यासाठी जीवाचा आटापीटा केला. पण ते दूर होऊ शकले नाहीत.


सना आणि लुईस यांनी स्ट्रीट बॉल लीगमध्ये गुंतवणूक केली होती. पण आता सनाने यातून अंग काढून घेतल्याचीही खबर आहे. लुईसने हॉटस्टेपर टीम खरेदी केली होती. सना या टीमचा प्रमुख चेहरा होती. पण गेल्या काही दिवसांत सना एकदाही हॉटस्टेपरसाठी मैदानात आली नाही. गत 30 नोव्हेंबरला अखेरची ती मैदानात दिसली होती. यानंतर तिने एकही मॅचला हजेरी लावली नाही.


इतकेच नाही तर सनाने लुईसला अनफॉलो केले आहे. शिवाय स्वत:च्या सोशल अकाऊंटवरचे त्याचे सर्व फोटोही डिलीट केले आहेत.

सना खान ‘बिग बॉस’च्या सहाव्या सीझनमध्ये दिसली होती. यानंतर सलमानच्या ‘जय हो’ या सिनेमात तिला संधी मिळाली होती. या पाठोपाठ ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ या चित्रपटातही तिची छोटीशी भूमिका होती. ‘वजह तुम हो’ या सिनेमात सना तिच्या बोल्ड आणि हॉट रूपात दिसली होती. लवकरच सना ‘टॉम, डिक अ‍ॅण्ड हॅरी 2’या सिनेमात दिसणार आहे.

Web Title: Sana khan Hot photoshoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.